Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी…; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

मयत राजाराम बाळकृष्ण चव्हाण हे चालक असून, आरोपींनी मोबाईलद्वारे त्यांना वडाप टाटा मॅजिक गाडीने टांगर येथे प्रवासी सोडण्याचे भाडे असल्याचे सांगून फसवून बोलवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 03:01 PM
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी...; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी...; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

सोनसाखळीसाठी खून, तिघांना जन्मठेप
३२ साक्षीदार तपासले; पुराव्यांच्या आधारे शिक्षा
दंड न भरल्यास भोगावी लागणार तीन महिन्यांची कैद

खेड: पैशाच्या हव्यासापोटी संगनमताने खून करून मयताच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या तिघा आरोपींना खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा खून मंडणगड तालुक्यात ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी घडला होता. या प्रकरणी मंडणगड पोलिसांत गुन्हा क्रमांक ४७/२०१७ नोंदविण्यात आला होता. खटला सेशन केस क्रमांक ०४/२०१८ म्हणून चालविण्यात आला.

नेमकी काय घडली होती घटना ?
मयत राजाराम बाळकृष्ण चव्हाण हे चालक असून, आरोपींनी मोबाईलद्वारे त्यांना वडाप टाटा मॅजिक गाडीने टांगर येथे प्रवासी सोडण्याचे भाडे असल्याचे सांगून फसवून बोलावले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने हलला करून दगडाने मारहाण करत खून केला. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल फोन चोरून मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

दंड न भरल्यास भोगावी लागणार तीन महिन्यांची कैद

दोषी ठरलेले आरोपी म्हणजे अभिजीत सुधाकर जाधव (२७, रा. गव्हे, ता. दापोली), नरेंद्र संतीय साळवी (२८), आणि अक्षय विष्णू शिगवण (२८, रा. बॉडीवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी आहेत. जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपीना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९२, ३९७, १२०(ब) व २०१ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

३२ साक्षीदार तपासले; पुराव्यांच्या आधारे शिक्षा

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ३२ साक्षीदार तपासले. मोबाईल लोकेशन, सीडीआर, एसडीआर, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल, साक्षीदारावी साक्ष आणि घटनास्थळावरून मिळालेला परिस्थितीजन्य पुरावा यावरून आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने घोषित केले. सरकारी पक्षातर्फे अॅड, मृणाल जाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर (मंडणगड पोलीस ठाणे), कोर्ट पेरवी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पवार आणि महिला हवालदार वैशाली सुकाळे यांनी प्रकरण उकलण्यात मोलाची भूमिका बजावली.

Web Title: Court punish three accused to life imprisonment to murder and chain snatching khed crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • crime news
  • Khed
  • life imprisonment

संबंधित बातम्या

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर
2

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक
3

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
4

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.