Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 03:25 PM
चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्...; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्...; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

Follow Us
Follow Us:

उदगीर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुकानात गेली असता संशयिताने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर शहरातील अवलकोंडा रोडवरील जयहिंद महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल लक्ष्मण कोकाटे (रा. नाईक चौक, उदगीर) याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे आणि पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य

७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार

मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. घटनेची माहिती मिळताच शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने थेट पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पीडित बालिका इमारतीच्या वॉशरूममध्ये गेली असताना नराधम सुरक्षारक्षकाने तिच्यावर हल्ला केला. या पाशवी अत्याचारामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून तिच्यावर अतिदक्षतेखाली उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: The police have registered a case against the accused for outraging the modesty of a girl in udgir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur Crime

संबंधित बातम्या

लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले
1

लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
3

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी
4

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.