
Pune News, Crime News, Crime and Justice, Political News
सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांच्या गावातच महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर घटना घडत असतील, तर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे पीडित कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जुन्नर प्रकरणावर बोलताना काँँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “नरसापूर प्रकरणानंतर पुन्हा एका निष्याप चिमुकलीचा जीव गेला. यावरून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, गुन्हेगारांना काडीचाही धाक उरलेला नाही. नसरापूर प्रकरणातील आरोपीविरुद्ध १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा सुनावली मेली, तसाच जलद न्याय जुन्नरच्या निष्पाप चिमुकलीला आणि तिच्या पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे.”
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. आरोपीची कसून चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घ्यावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘गावात पोलिस चौकी दहा वर्षांपासून बंद, मग महिला-बालकांची सुरक्षा कोण करणार?’ असा सवाल उपस्थित करत सुळे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. पिंपळवंडी गावातील पोलिस चौकी गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्याचा दावा करत सुप्रिया सुळे यानी या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष विनती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असून, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्यासारखा कठोर कायदा लागू करावा, अशी मागणीही रोहित पवार यानी केली. केवळ घोषणा आणि आश्वासनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सुटणार नाही. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात महिला आणि चिमुकल्यांवर अत्याचार होत आहेत. पोलिस केवळ व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत व्यस्त असल्याची टीका रोहित पवारांनी केली.
जुन्नरमधील घटनेच्या पाश्र्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्याच्या गृहव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुख्यमंत्री आणि सरकारकडून शब्दांचा खेळ करण्याऐवजी प्रत्यक्षात गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यानी स्पष्ट केले, या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.