Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करण्यासाठी त्याने आधी सासरच्यांना मारहाण केली, त्यामुळे तुरुंगाची हवा खाल्ली. सुटका झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पत्नी घराबाहेर पडली अन् पतीने तिला भररस्त्यात गाठले... त्यानंतर घडलेल्या हत्याकांडाने छतरपूर हादरले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 04:59 PM
Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Follow Us
Follow Us:
  • सासऱ्यांची जमीन नावावर करण्यावरून वाद; पतीला आधीच झाली होती अटक
  • सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नी ज्योतीची भररस्त्यात हत्या
  • महोबातून आरोपी पतीसह साथीदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात
 

छतरपूर : सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करण्याच्या मागणीवरून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांशी वाद घालणाऱ्या पतीने सुटकेनंतर अवघ्या दोन दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील छतरपूर येथे घडली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या साथीदाराला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

दहा वर्षांपूर्वी झाले होते लग्न

लखन आणि ज्योती यांचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लखनला त्याच्या सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करून हवी होती. मात्र, ज्योतीच्या आई-वडिलांनी याला विरोध केला. यावरून लखनने सासरच्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. काही दिवसांनंतर लखनची सुटका झाली. मात्र, सुटकेनंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याने पत्नी ज्योतीची हत्या केल्याचा आरोप आहे.

मुलांसह भाड्याच्या घरात राहत होती ज्योती

ज्योती सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या घरात चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांसह राहत होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती जवळच्या एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी ज्योती घरातून चहापत्ती आणण्यासाठी बाहेर पडली होती. याच वेळी लखन एका साथीदारासह परिसरातील मुख्य रस्त्यावर आला. त्याने ज्योतीला अडवून तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा:Pune News: परीक्षेनंतर शिक्षकांनी पालकांना सांगण्याचं म्हटलं अन् १४ वर्षीय अनमोल घरातून गायब; जान्हवी किल्लेकरचं भावनिक आवाहन!

भररस्त्यात हल्ला; नागरिकांसमोर हत्या

लखनने ज्योतीला रस्त्यावर पाडून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. हा प्रकार भररस्त्यात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी छतरपूरमधून पसार झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी लखन आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Madhya pradesh chhatarpur wife jyoti murder property dispute husband arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • crime news
  • Murder Case
  • Murder News

संबंधित बातम्या

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
1

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
2

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.