Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: भयावह! ३६ महिने, ९१ मृतदेह…, दिल्लीतील रक्तरंजित कालवा, मृतदेह येतात तरी कुठून? पोलीसही अचंबित

Delhi Crime News : दिल्लीतील असा एक कालवा जिथे मृतदेहांचा एक छावणी असतो, म्हणूनच या कालव्याला रक्तरंजित कालवा असं देखील म्हणतात. या कालव्यात कधी डोकं नसलेला मृतदेह तर कधी हात पाय नसणारे मृतदेह दिसून येतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2025 | 06:14 PM
३६ महिने, ९१ मृतदेह..., दिल्लीतील रक्तरंजित कालवा, मृतदेह येतात तरी कुठून? पोलीसही अचंबित (फोटो सौजन्य-X)

३६ महिने, ९१ मृतदेह..., दिल्लीतील रक्तरंजित कालवा, मृतदेह येतात तरी कुठून? पोलीसही अचंबित (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Crime News in Marathi: दिल्लीतील असा एक कालवा ज्याला दिल्लीची जलजीवनरेषा मानला जातो. परंतु या कालव्याने अनेक लोकांचे रक्त प्यायले आहे. त्यामुळे या कालव्याला दिल्लीतील रक्तरंजित कालवा म्हणूनही ओळख निर्माण झाली. या बवाना कालव्यात दररोज मृतदेहांचा एक छावणी असतो. या कालव्यातील मृतदेहांना डोके नव्हते तर काहींना पाय नव्हते. हे मृतदेह इतके भयानक अवस्थेत आहेत की कधीकधी त्यांची ओळख पटत नाही. अलिकडेच या कालव्यात आणखी एक मृतदेह आढळला ज्याचे डोके गायब होते आणि हात आणि पाय धडापासून वेगळे होते. म्हणूनच या भागातील स्थानिकां मृतदेह पाहण्याची सवय झाली आहे. नेमकं कालव्याचे काय आहे रहस्य …

दिल्लीत रात्रीचे साधारण १० वाजले होते. रोहिणी सेक्टर १३ मधील हैदरपूर वॉटर प्लांटमधील एक कर्मचारी त्याची नियमित तपासणी करत असताना अचानक त्याला लोखंडी चाळणीवर काहीतरी अडकलेले दिसले. तो एका मृत शरीराचा भाग होता, पण त्याचे डोके, हात आणि पाय गायब होते. पण जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा कोणताही आरडाओरडा नव्हता, गोंधळ नव्हता, का? कारण या वर्षी येथे सापडलेला हा दहावा मृतदेह होता. दिल्लीच्या या जलशुद्धीकरण केंद्रात मृतदेह सापडणे आता ‘सामान्य’ झाले आहे. २०२२ ते २७ एप्रिल २०२५ पर्यंत या कालव्यात एकूण ९१ मृतदेह सापडले आहेत. दरवर्षी हा आकडा सरासरी २५ ते ३० पर्यंत वाढत आहे.

पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं, दोन दिवसात तब्बल ‘इतके’ फ्लॅट फोडले; लाखोंच्या ऐवजावर मारला डल्ला

मृतदेह कुठून येतात?

मृतदेह कुठून येतात? या गूढतेचे उत्तर म्हणजे मुनक कालवा. हरियाणातील कर्नाल येथून उगम पावणारा हा कालवा १०२ किलोमीटर लांबीचा आहे आणि सिमेंटेड सीएलसी आणि कच्चा डीएसबी या दोन भागांमधून दिल्लीच्या हैदरपूर वॉटर प्लांटपर्यंत पोहोचतो. वाटेत सुरक्षा नाही, प्रतिबंध नाही, देखरेख नाही. यामुळे हरियाणा किंवा दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात कालव्यात टाकलेले मृतदेह शेवटी येथे पोहोचतात.

मृतदेहांची ओळख पटू शकली नाही

याप्रकरणी केएन काटजू मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सांगितले की, हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याव्यतिरिक्त, पुरावे नष्ट करण्यासाठी शस्त्रे आणि वाहने देखील या कालव्यात टाकली जातात. डीसीपी रोहिणी अमित गोयल म्हणतात, ‘दर महिन्याला दोन-तीन अशा घटना घडतात ज्यात मृतदेह आढळतात. पोलिसांनाही पीडितांची ओळख पटवणे, त्यांच्या कुटुंबियांना शोधणे, मृत्यूचे कारण शोधणे, खुन्याला अटक करणे आणि अंत्यसंस्कार करणे ही जबाबदारी घेतात. अनेक प्रकरणांमध्ये मृतदेहांची ओळख पटू शकत नाही.

शेवटचा ओळख पटलेला मृतदेह २३ एप्रिल २०२५ रोजी सापडला. मृतदेहाची ओळख २७ वर्षीय अनुप म्हणून झाली. होळीच्या दुसऱ्या दिवशी बवाना पोलिस ठाण्यात अनुपच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्या कपड्यांमध्ये सापडलेल्या दोन आधार कार्डच्या मदतीने पोलिसांनी कुटुंबाला बोलावले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की तो सुमारे ४० दिवसांपूर्वी बुडाला होता आणि त्यामुळेच त्याचे शरीर खूपच कुजले होते. गेल्या तीन वर्षांत सापडलेल्या एकूण ९१ मृतदेहांपैकी फक्त २८ मृतदेहांची ओळख पटली आहे.

मृतदेहांची ओळख का पटत नाही?

याप्रकरणी एसएचओ प्रमोद आनंद यांनी सांगितले की, ‘खूनाच्या प्रकरणांमध्ये, आरोपी मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात, कधीकधी चेहरा विद्रूप करतात, शरीराचे अवयव बांधतात, जड वस्तूला बांधतात आणि बुडवून मारतात.’ बऱ्याचदा मृतदेहाचे डोके गायब असते आणि सापडलेली डोके देखील ओळखता येत नाहीत. आत्महत्या करणारे बहुतेक लोक त्यांचे ओळखपत्र जपून ठेवत नाहीत. यामुळेच बऱ्याचदा या मृतदेहांची ओळख पटत नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

रांजणगावात खळबळ! महिला आणि दोन चिमुकल्यांचा सापडला अर्धवट जळालेला मृतदेह, हातावर ‘जयभीम’….

Web Title: Delhi bawana canal why is it called bloody canal dead bodies are found here every sixth day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • crime
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…
1

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय
2

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
3

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
4

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.