पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा आणि दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रांजणगावात एकाच खळबळ उडाली आहे. पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे. रांजणगाव खंडाळे परिसरातील अहिल्यानगर महामार्गाजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला रविवारी सकाळी अर्धवट जळालेले हे तीन मृतदेह सापडले. या महिलेची आणि तिच्या लहान मुलांची हत्या झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपी हत्यारा कोण याचा शोध पोलीस घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या तिन्ही मृतदेहाचा बारसचा भाग जाळला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. महिलेचे अंदाजित वय २५ असावे आणि तिच्यासोबतचे दोन मुलांचे वय चार आणि दीड वर्षे असावे. बहुतांश भाग या तिन्ही मृतदेहाचे जाळले असले तरी महिलेच्या हाताचा काही भाग शिल्लक राहिला होता. फॉरेन्सिक पथकाकडून या सगळ्या अवशेषांची तपासणी करण्यात आली तेव्हा महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू गोंदवला असल्याचे निदर्शनास आले. यावरुन आता पोलिसांना या महिलेची आणि तिच्या मुलांची ओळख पटवण्याचे कठीण काम करावे लागणार आहे.
या महिलेला तिच्या नवऱ्याने किंवा अज्ञात व्यक्तीने ठार मारून जाळल्याचा अंदाज आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सध्या पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या तपासातून आता काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या तिघांना मारून याठिकाणी आणण्यात आले असावे. यानंतर तिन्ही मृतदेहांवर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. मात्र पाऊस असल्याने आग विझवल्याने मृतदेहाचे काही अवशेष शिल्लक राहिले. मुख्य महामार्गापासून २०० मीटर अंतरावर हे अर्धवट जळालेले मृतदेह सापडले आहेत. हा भाग महामार्गाला लागून असल्याने पोलिसांना सीसीटीव्ही किंवा अन्य कोणत्या मार्गाने या हत्येचे धागेदोरे मिळू शकतात. या मृतदेहांचे आता शवविच्छेदन केले जाणार आहे. आई आणि मुलांना जिवंतपणीच जाळले की त्यांना ठार मारून नंतर त्यांचे मृतदेह जाळण्यात आले, याचा उलगडा शवविच्छेदन चाचणीतून होणार आहे.
पुण्यातील मंगळवार पेठेत गोळीबार; दोघे दुचाकीवरुन आले अन्…