Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम

Delhi Crime: परी चौक ते काश्मिरी गेट हा प्रवास ४७ किलोमीटरचा आहे. संपूर्ण प्रवासात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आणि चालक व वाहकाने तिला काश्मिरी गेटवर सोडून पळ काढला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 31, 2026 | 10:48 AM
दिल्लीत पुन्हा एकदा भयानक घटना (फोटो सौजन्य - iStock)

दिल्लीत पुन्हा एकदा भयानक घटना (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत हादरवणारी घटना 
  • ड्रायव्हर आणि कंडक्टरने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग 
  • ४७ किलोमीटरपर्यंत प्रवासात केले हाल
Delhi Crime: दिल्ली शहर वा आसपासची गावं अजूनही मुलींसाठी चांगली नाहीत हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. दिल्लीत पुन्हा एकदा हादरवून सोडणारी घडना घडली आहे. दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरातून एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे आता समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे.

ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक केली आहे. पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असून ती इयत्ता ११वी मध्ये शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि…

ही विद्यार्थिनी आपल्या कुटुंबीयांना न कळवता नोएडाला आली होती.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, कुटुंबीयांवर नाराज असलेली ही विद्यार्थिनी त्यांना न कळवता घरातून निघाली होती आणि नोएडातील तिच्या चुलत बहिणीकडे जात होती. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून परी चौकात उतरली. त्याचवेळी एक रिकामी स्लीपर बस तिथून जात होती. त्या विद्यार्थिनीने बस थांबण्याचा इशारा केला, त्यानंतर बस थांबली. 

ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला सांगितले की ते नोएडा सेक्टर ६३ ला जात आहेत आणि तिला बसमध्ये घेतले. असा आरोप आहे की बस सुटल्यानंतर लगेचच, कंडक्टरने पीडितेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला आणि प्रतिकार केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

आरोपींनी पीडितेला रात्री उशिरा काश्मिरी गेट बस स्टँडजवळ रिंग रोडवर उतरवले आणि ते पळून गेले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तिमारपूर येथील बस पार्किंगमधून अटक केली. या घटनेत वापरलेली स्लीपर बस जप्त करण्यात आली असून तिची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

Thane Crime: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

परी चौक ते काश्मिरी गेट असा ४७ किलोमीटरचा प्रवास

पोलिसांच्या सूत्रांनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोपींनी ती दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील एका वर्कशॉपमध्ये नेली होती. दुरुस्तीनंतर, चालक आणि वाहक रिकामी बस घेऊन तिमारपूरकडे जात असताना परी चौकात त्यांची त्या विद्यार्थ्याशी गाठ पडली. बसने परी चौकापासून काश्मिरी गेटपर्यंत अंदाजे ४७ किलोमीटरचा प्रवास केला.

बस स्लीपर होती आणि तिला पडदे होते, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या कोणालाही बसच्या आत पाहता येत नव्हते. त्यामुळे ही घटना होत असताना कोणत्याही वाटसरूला प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नसते. दरम्यान दोघांनाही अटक झाली असून आता पुढे काय कारवाई होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: Delhi crime gang assault 16 year old girl in sleeper bus near kashmiri gate driver conductor arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • crime news
  • crime news delhi
  • Sexual Assault

संबंधित बातम्या

‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार
2

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
3

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
4

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.