दिल्लीत प्रॉपर्टी डीलरची हत्या (फोटो सौजन्य-X)
Delhi Crime News in Marathi: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरली आहे. शुक्रवारी सकाळी बाह्य दिल्लीतील पश्चिम विहार भागात अज्ञात हल्लेखोरांनी फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये एका प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही शुक्रवारी (11 एप्रिल) सकाळी रस्त्याच्या मधोमध ही खळबळजनक घटना घडली. राजकुमार दलाल नावाच्या एका व्यावसायिकाची फॉर्च्युनर कारमधून जिमला जात असताना हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाला अनेक गोळ्या लागल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. य घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हेगारांनी हा गुन्हा का केला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कारला लक्ष्य करून ८ ते १० राउंड गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती प्रॉपर्टी डीलर असल्याचे समोर आले. मृताचे नाव अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. घटनेच्या वेळी प्रॉपर्टी डीलर फॉर्च्युनरमध्ये बसला होता. यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. सध्या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु सुरुवातीच्या तपासात शत्रुत्वाची शक्यता वर्तवली जात आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लवकरच हे प्रकरण उघड होईल असा दावा करण्यात आला आहे.
अचानक झालेल्या गोळीबाराच्या या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जमाव पांगला. पोलीस या प्रकरणाचा अनेक दृष्टिकोनातून तपास करत आहेत. गोळीबार करणारे गुन्हेगार प्रॉपर्टी डीलरवर किती काळ हेरगिरी करत होते, याचाही तपास केला जात आहे. खरं तर, ज्या पद्धतीने गुन्हा घडवला गेला आहे, त्यावरून असे मानले जाते की गुन्हेगारांनी ते पूर्णपणे नियोजनबद्धपणे केले होते.