ठाणे जिल्हा हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो .ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात कॅम्प नंबर २ मध्ये बंजारा विकास परिषदेच्या वतीने गरब्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र आनंदात सुरू असलेल्या गरब्यात काही मिनिटात दहशतीचे वातावरण निर्माण झाल. कार्यक्रमाच्या ठिकाणी एका भाईने एंट्री करत मी इथला भाई आहे माझी परवानगी घेतली का ? गरब्याचा कार्यक्रम करायला माझी परवानगी घेतली का ? अस म्हणत त्याने शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावरच थेट बंदूक धरली आणि हवेत दोन गोळ्या सोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाखा प्रमुखांच्या भावाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला म्हणून वातावरण निवळलं
तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…
कोणी रोखली बंदूक ?
सोहम पवार हा अवघ्या १९ वर्षाचा पोरगा त्याने बापासहित कार्यक्रमाच्या ठिकाणी आला . बाप ही मुलाला सपोर्ट करत होता अशी माहिती आहे . सोहम पवार आणि अनिल पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मी इथला भाई आहे ! कार्यक्रम घेताना परवानगी घेतली का ? मला विचारलं का ? अशी थेट धमकी त्याने बाळा भगूर यांना दिली. त्यानंतर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आणि त्या नंतर त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ठाण्यातच शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखली !
शाखा प्रमुख बाळा भगुरे यांनी गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मोठी गर्दी त्यांच्या गरब्याच्या ठिकाणी होत असते . त्याने येवून थेट धमकी दिली . सोहम पवारांकडून पिस्तूल पण जप्त करण्यात आली आहे . त्याच्या वडिलांनाही ताब्यात घेतला आहे .मात्र या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होत . उल्हासनगर पोलिस या घटनेचा अधिकच तपास करत आहेत .
अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण
अंबरनाथमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आर्थोपेडिक डॉक्टरच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ही डोंबिवली येथील रहिवासी आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या पतीची मृत्यू झाली असून त्यांच्या उपचारादरम्यान पीडितेची आणि डॉक्टरची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.