(फोटो सौजन्य: Pinterest)
Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
खूनाचे कारण धक्कादायक
मृत मुलीची ओळख सुनील दास यांची सहा महिन्यांची मुलगी पूजा कुमारी अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडिल सुनील दास रोजगारासाठी चंदीगढ येथे काम मजूराचे काम करतात. घरी त्यांची पत्नी, ६ महिन्यांची मुलगी आणि त्याची आई सरस्वती देवी एकत्र राहतात. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ६ महिन्यांची पूजा अचानक जोरजोरात रडू लागली. पूजाची आई तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते पण पूजा काही शांत व्हायचे नाव घेत नाही. अशात वैतागून महिलेने घरात भाजी चिरण्यासाठीचा कोयता घेतला आणि त्याने पूजाचा गळा चिरत तिची हत्या केली.
सांगण्यात येत आहे की, या घटनेनंतर महिलेने स्वत:च्याही गळ्यावर अनेक वार केले आणि स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. अशात खोलीतून येणारा आवाज ऐकून सरस्वती देवी जेव्हा घटनेस्थळी पोहचली तेव्हा तिथली दृष्ये पाहून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. जमिनीवर सहा महिन्यांची नात रक्तबंबाळ होऊन पडली होती तर सून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. अशात सासूने सूनेच्या हातातील विळा हिसकावून घेतला आणि आरडाओरड करत आजूबाजूच्यांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपी आईला केली अटक
शेजाऱ्यांनी माहिती देताच गोपाळपूर पोलिस ठाण्यातील अंकित कुमार पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पूजाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून रिपोर्टनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या, जिथे डॉक्टरांनी टाके घातले.
तक्रार दाखल केली
शुक्रवारी सकाळी मृत मुलीची आज्जी सरस्वती देवी यांच्या तक्रारीच्या आधारावर गोपाळपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कोयत्यालाही ताब्यात घेतले आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून प्राथमिक तपासात महिलेच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी सांगितले की तपास पूर्ण झाल्यानंतर आणि वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चाैकशी केली जात आहे.






