Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

Rapido RTO Action News: छत्रपती संभाजीनगरात आरटीओने रॅपिडो ॲपच्या तीन संचालकांवर अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 30, 2026 | 03:15 PM
Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल!

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल!

Follow Us
Follow Us:
  • रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल!
  • अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका
  • वाचा सविस्तर बातमी!
Chhatrapati Sambhajinaga: ऑनलाइन रॅपिडो अॅपच्या माध्यमातून परिवहन विभागाची परवानगी न घेता शहरात प्रवासी वाहतूक सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) थेट कंपनीच्या संचालकांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Rapido RTO Action) केला आहे. अनधिकृत प्रवासी वाहतुकीच्या प्रकरणात कंपनीच्या संचालकांना आरोपी करण्यात आल्याची ही पहिलीच कारवाई असल्याने अॅपआधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रॅपिडो कंपनीचे संचालक ऋषीकेश एस.आर., पवन गुट्टपल्ली आणि अरविंद संका अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मोटार वाहन निरीक्षक अभिजीत जगनाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अनधिकृत प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान रॅपिडो अॅपच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. या वाहनचालकांची कोणतीही अधिकृत नोंद परिवहन विभागाकडे नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आरटीओने नमूद केले आहे.

आरटीओच्या भरारी पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अरुणा लहामगे आणि गंगाराम भागडे यांनी केलेल्या तपासणीत (एमएच-२०-बीपी-०६८६), (एमएच-२०-एचआर-९०२५) आणि (एमएच-३०-बीयू-६३१६) या दुचाकींवरून ऑनलाइन बुकिंगद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळले. संबंधित चालकांकडे चौकशी केली असता रॅपिडो कंपनीने दिलेल्या आयडीच्या माध्यमातून त्यांना प्रवासाचे भाडे मिळत असल्याचे स्पष्ट झाले. परिवहन विभागाची परवानगी नसताना व्यावसायिक प्रवासी वाहतूक करून शासनाच्या महसुलालाही फटका पोहोचविण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामांच्या बेटरमेंट चार्जेसमध्ये १००% सूट

तसेच अशा सेवेमुळे होण्याबरोबरच गुन्हेगारी घटनांचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. प्रवाशांची फसवणूक प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळावी यासाठी रॅपिडो कंपनीने न्यायालयीन लढा दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतरही शहरात अॅपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे तपासात आढळल्याचा उल्लेख आरटीओने केला आहे. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार खराडकर करीत आहेत.

जबाबदारी निश्चितचा आरटीओचा प्रयत्न

अनधिकृत प्रवासी वाहतुकीच्या प्रकरणात यापूर्वी बहुतांश वेळा वाहनचालकांवरच कारवाई होत होती. मात्र, या प्रकरणात सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या संचालकांनाच थेट आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून परवानगीविना प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याचा आरटीओचा प्रयत्न मानला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar: त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या! विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना दिल्या आढावा बैठकीत सूचना

Web Title: Direct case registered against rapido company directors in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • e bike taxi
  • maharashtra news
  • Rapido
  • RTO

संबंधित बातम्या

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
1

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
2

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या
3

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
4

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.