beed (फोटो सौजन्य : social media)
बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.ही घटना आंबाजोगाई येथील राहत्या घरात आत्महत्या केले आहे. सर्व कुटुंबीय गौरी-गणपतीच्या सणासाठी नागदरा या गावी गेले होते. त्यावेळेस ते घरात एकटेच होते. त्यांनी रात्री गळफास घेत आत्महत्या केली.
का झाले होते ते बडतर्फ?
सुनील नागरगोजे यांची परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी चौकशी सुरु होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यानंतर बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
खळबळजनक! शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; कारण काय? नागपूर येथील घटना
नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदराने गळ्याला दोर लावतात आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव पीव्ही वर्मा असे आहे. वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार पीव्ही वर्मा यांचे सध्या वर्धा जिल्ह्यातील एमआयडी देवळी येथे काम सुरु होते. या दरम्यान जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांची थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आर्थिक संकटात दोर लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.
कंत्राटदार संघटनेची मागणी काय?
राज्यभरात जवळपास 90 हजार कोटी कंत्राटदाराचे बिल थकीत असून बहुतांश कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याची प्रतिक्रिया राज्य कंत्राटदार संघटनेच्या एम सरोदे यांनी दिलीय. त्यातूनच हि दुर्दैवी घटना घडल्याचे ते म्हणाले. सोबतच पोलिसांनी आणि शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आली आहे.
प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न; तरुणीने केला आरडाओरडा अन्…