Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: कल्याणात पोलिसाला मारहाण! व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

कल्याणच्या दुर्गाडी चौकात वाहतूक नियम पाळण्यास सांगितल्याने चार तरुणांनी वाहतूक पोलीस विलास भागीत यांना बेदम मारहाण केली. ते गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 26, 2026 | 10:58 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • दुर्गाडी चौकात वाहतूक नियमांवरून वाद, पोलिसावर हल्ला
  • चार तरुणांकडून बेदम मारहाण; पोलीस गंभीर जखमी
  • व्हिडिओ व्हायरल; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
कल्याण: कल्याण शहरात कायद्याच्या सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगितल्यामुळे एका कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले. शहराच्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि नागरिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कार्यक्षमता आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या निर्वावलेल्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

काय नेमकं घडलं?

शनिवारी रात्री दुर्गाडी चौक येथे वाहतूक पोलीस कर्मचारी विलास भागीत हे आपले कर्तव्य बजावत होते. रात्री १० वाजेच्या सुमारास जेव्हा चौकात वाहनांची मोठी कोंडी झाली होती, तेव्हा विलास भागीत यांनी एका कारला वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येताना पाहिले जेव्हा त्यांनी कार थांबवून चालकाला विचारणा केली आणि विरुद्ध दिशेने गाडी आणण्याचे कारण विचारले, तेव्हा कारमधील व्यक्तींनी कायद्याचा सन्मान करण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

खाजगी रुग्णालयात पोलिसावर उपचार सुरू

  • कारमधील चार तरुणांनी संयम गमावून विलास भागीत यांच्यावर हल्ला केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
  • प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
  • घटनास्थळावर गोंधळ वाढताना पाहून चारही आरोपी तिथून पसार होण्यात यशस्वी झाले जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
  • स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
  • प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हल्ला करणारे आरोपी हे शिवसेना (शिंदे गट) समर्थक असल्याचे समजते.
Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती
💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: शनिवारी रात्री कल्याणच्या दुर्गाडी चौकात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याबाबत विचारणा केल्याने वाद झाला.

  • Que: जखमी पोलिसाची स्थिती काय आहे?

    Ans: विलास भागीत गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Kalyan news policeman assaulted in kalyan the video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Tamilnadu Crime: अल्पवयीन मुलाला समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती; विरोध करताच केली हत्या
1

Tamilnadu Crime: अल्पवयीन मुलाला समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती; विरोध करताच केली हत्या

Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती
2

Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

Sangli Crime:  प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?
4

Sangli Crime: प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.