SBI ने ग्राहकांना दिला इशारा (फोटो सौजन्य - iStock)
आजकाल ऑनलाईन फसवणूक जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दर १० व्यक्तींमधून एकाची फसणवूक ऐकू येते आणि त्यात नक्की काय करायचं हे सामान्य माणसांना माहीतही नसते. पण हल्ली हे प्रकार जास्त वाढताना दिसून येत आहेत आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागात अशा केस अधिक दिसून येत आहे.
सध्या बाजारात एक नवीन प्रकारची फसवणूक दिसून येत आहे. म्हणूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना या नवीन प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बँकेने जनहितार्थ इशारा जारी केला आहे की सायबर गुंड आता ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडलेले मोबाईल नंबर बदलून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही घाबरून न जाता हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती घ्या
चोरट्यांची अजब शक्कल, महिलांचा वेश परिधान केला अन्…; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गुन्हेगार लोकांना कसे अडकवत आहेत?
सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्ती कॉल किंवा SMS द्वारे सदर व्यक्तींना सांगतात की, “तुमच्या पेन्शन ऑर्डर (PPO) ची प्रक्रिया जलद करण्यासाठी लिंकवर क्लिक करा” किंवा धमकी देतात की “पेन्शनची पडताळणी प्रलंबित आहे, तात्काळ कारवाई न केल्यास पेन्शन थांबवले जाईल”.
अशा प्रकारे, ते खाजगी माहिती किंवा लिंकवर क्लिक करून ग्राहकांच्या खात्यात प्रवेश मिळवतात आणि तुम्ही लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातील पैसे अचानक गायब होऊन त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुम्ही आयुष्यभर कमावलेली कमाई एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकू शकते. त्यामुळे SBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की बँक कधीही फोन, एसएमएस, लिंक किंवा एटीएम भेटीद्वारे PPO पडताळणी करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तींचा फोन उचलू नका अथवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
‘तो’ महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला, हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
सुरक्षित कसे राहायचे?
SBI ने ग्राहकांना आठवण करून दिली आहे की “तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर तुमच्या बँक खात्याची गुरुकिल्ली आहे. तो सुरक्षित ठेवा आणि फसवणूक टाळा.” बँकेने असेही स्पष्ट केले आहे की १६०० वरून येणारे कॉल खरे आणि सुरक्षित आहेत.