दिव्या शिंदेचा जामीन मंजूर
याबरोबरच तक्रारदार किंवा प्रत्यक्षदर्शींना भेटण्याचा, संपर्क करण्याचा किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. न्यायलयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये. पोलिसांना तपासात सहकार्य करावे. यासह इतर अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. तपासाचा बहुतांश भाग पूर्ण झाला आहे. तक्रारदार रूग्णालयात असला तरी धोक्याबाहेर आहे. तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. तक्रारदार आणि कुटुंबाच्या जबाबानुसार दिव्याने स्वतः मारहाण केली नाही. याबरोबरच तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याच्या बाबी लक्षात घेत जामीन मंजूर करण्यात आला. दिव्याची बाजू अॅड. सुभाष हुल्याळकर यांनी मांडली. त्यांना ॲड जावेद जमादार यांनी सहाय्य केले.
दरम्यान, बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे पुन्हा वादात सापडली असून, यंदा ती मोठ्या प्रकरणामध्ये अडकली आहे. आता मात्र पुणे पोलिसांनी तिला अटक करण्यात आली. एका निवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरी घुसून त्यांना मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर असून काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिला पकडून कोर्टात हजर केली.
बिग बॉसमधून पण हाकलं होतं
दिव्या शिंदे आधी रील्समुळे फेमस झाली होती. तिच्या रील्स खूप व्हायरल व्हायच्या, त्यामुळेच तिला बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाली होती.पण बिग बॉसच्या घरात पण तिचं वागणं वादग्रस्तच होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये तिने घरातल्या इतर स्पर्धकांना धमकावलं म्हणून तिला शो मधून बाहेर काढलं होतं. तेव्हा पण ती खूप चर्चेत आली होती.आता या खंडणी आणि मारहाणीच्या केस मुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. एक सोशल मीडिया स्टार असं कृत्य कसं करू शकते, यावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्ट तिला काय शिक्षा देतंय हे बघावं लागेल.






