
फोटो सौजन्य सोशल मिडिया
८ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत ही कारवाई लागू राहणार असून,या काळात बेकरीला अन्न व्यवसाय करता येणार नाही. सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर यांनी ७ ऑक्टोबर रोजी बेकरीची अचानक तपासणी केली.
यावेळी अन्नपदार्थ आणि पाण्याच्या गुणवत्तेचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नसणे, पुनर्पेकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र नसणे, तसेच ठेवण्यासाठी पात्र तांत्रिक व्यक्ती अनुपस्थित असणे, अशा त्रुटी आढळल्या.
ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण झालेले नव्हते. अॅप्रन, हातमोजे व डोक्याचे संरक्षक आवरण यांचाही वापर केला जात नव्हता. बेकरीत कीड नियंत्रण आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था नव्हती. कचरा उघड्यावर टाकण्यात आला होता.
या त्रुटींमुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) दयानंद विठ्ठल पाटील यांनी परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले. संबंधित व्यावसायिकाला सर्व त्रुटी दूर करून आवश्यक पुराव्यांसह अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबन काळात बेकरीवर कडक पाळत ठेवण्याचे आदेश सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले.
कप केकमध्ये रबर-प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार, प्रयोगशाळा अहवाल, फूड-ग्रेड प्रमाणपत्र आणि साठा नोंदवहीचा अभाव, अस्वच्छता, उघड्यावर कचरा, कीड नियंत्रणाचा अभाव आणि कामगारांच्या आरोग्य-सुरक्षेकडे दुर्लक्ष.
Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात