Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…

मृत आदित्य भोंडवे व आरोपी वैभव डोंगरे हे पूर्वीचे मित्र असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली होती. हे प्रकरण सक्करदरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 09:34 AM
दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर

Follow Us
Follow Us:

नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाजार परिसरात बुधवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसन दोन तरुणांच्या निर्घृण हत्येत झाले. या घटनेत आदित्य ऊर्फ सोनू गजानन भोंडवे (वय २७, सोमवारी क्वार्टर) आणि आदित्य राऊळकर (वय२५, बजरंगनगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषी नरेश पुट्टेवार, वैभव ऊर्फ दादू प्रदीपराव डोंगरे, वेदांत डबीर आणि अभी राऊत यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. ऋषी पुट्टेवार हा गोंड मोहल्ला परिसरात फळांचा घाऊक व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपायुक्त रश्मिता राव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

न्यायवैद्यक पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात मृत आदित्य भोंडवे याच्यावर हल्ला, घरफोडी व दरोड्याचे काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

दोन्ही गट दुपारी पोलिसांच्याच ताब्यात

मृत आदित्य भोंडवे व आरोपी वैभव डोंगरे हे पूर्वीचे मित्र असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली होती. हे प्रकरण सक्करदरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटांना काही काळ ताब्यात घेतले होते. मात्र, रात्री त्यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा वाद उफाळून आला.

बेदम मारहाण; घटनास्थळीच झाला मृत्यू

रात्री साडेआठच्या सुमारास आदित्य भोंडवे आणि आदित्य राऊळकर हे पैशांची मागणी करण्यासाठी पुट्टेवारच्या फळांच्या दुकानाजवळ गेले. तेथे दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दोघांवर हल्ला चढवला. फळांच्या दुकानाजवळ पडलेल्या मोठ्या दगडाने तसेच इतर हत्यारांच्या साहाय्याने दोघांच्या डोक्यावर आणि शरीरावर वारंवार प्रहार केले. जीव वाचविण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. गँगवॉर, जुने वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी संबंधित घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेष म्हणजे 24 तासांच्या कालावधीत तीन खुनांच्या घटना घडल्याने नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं

Web Title: Double murder in nagpur third killing in 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ
2

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
3

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
4

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.