नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. कारचालक हा दारूच्या नशेत होता. तीव्र गतीने तो कार चालवत होता. त्यामुळे त्याने २५ ते ३० दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना कट मारली. कट मारल्याने अनेक जण खाली पडले आणि जखमी झाले. यामुढे संतप्त गावकरी त्या गाडीचा पाठलाग करू लागले. काही अंतरावर जाऊन ही कार नाल्यात पलटी झाली. गावकऱ्यांनी त्या कार चालकाला पकडले आणि चांगलाच चोप दिला. ही घटना रामटेक तालुक्यातील नगरधन येथे रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली आहे.
आरोपी कार चालकाचे नाव हर्षल वाघमारे असे आहे. तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय तो चार दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावात आला होता. असे देखील सांगण्यात येत आहे. रामटेक पोलिसांनी मध्यधुंद अवस्थेतील आरोपीला ताब्यात घेतले असून जमावाने मारहाण केल्यामुळे तो किरकोळ जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू
नाशिकमध्ये भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात राधाबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले.
दररोजप्रमाणे त्या परायणाला जात होत्या
या घटनेप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण महिना सुरु असल्यामुळे बळी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राधाबाई या दररोज जात होत्या. दररोजप्रमाणे त्या काल जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.