Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुणे FC रोडवर थरार! मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला

पुण्यातील एफसी रोडवर मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली. वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी धाडसाने बस थांबवून त्याला पकडले; पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 08:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून रस्त्यावर बेदरकार चालवली
  • वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण
  • नागरिकांनी बस थांबवून आरोपीला पकडले; पोलिसांच्या ताब्यात
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकारपणे चालवल्याचे समोर आले आहे दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने बसचे स्टेअरिंग हातात घेऊन रस्त्यावरील वाहनांना उडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, पुणेकरांना सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी या ‘तोतया’ चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…

नेमकं काय घडलं?

शनिवारी संध्याकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. अशातच एक पीएमपीएमएल बस अचानक अत्यंत वेगात आणि वेड्यावाकड्या पद्धतीने धावू लागल्याने लोकांचे लक्ष गेले. ही बस चालवणारी व्यक्ती मद्याच्या नशेत तर होतीच, पण तिला बसवर कोणतेही नियंत्रण राखता येत नव्हते. बसने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अत्यंत धोकादायक पद्धतीने कट मारले. काही वाहनांना त्याने थेट धडक देण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पाहून पादचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाजूला धाव घेतली.

बसचा वेग आणि ड्रायव्हरची वर्तणूक पाहून हा ड्रायवर नसल्याचा संशय काही नागरिकांना आला. त्यांनी धाडस दाखवून बस अडवली आणि चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला खाली खेचले. मद्यधुंद अवस्थेत त्याने बस चोरल्याचे लोकांच्या लक्षात आले. तेथील नागिरकांनी या तरुणाला रस्त्यावरच चांगलाच चोप दिला. यावेळी तिथे मोठी गर्दी जमली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करून संबंधित मध्यधुंद तरुणाला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली असता, हा तरुण पीएमपीएमएलचा कर्मचारी किंवा चालक नसून एक सामान्य नागरिक आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने कुठूनतरी उभी असलेली रिकामी बस चोरली आणि ती थेट फर्ग्युसन कॉलेज रोडवर आणली. पीएमपीएमएल प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून बस नक्की कुठून आणि कशी चोरीला गेली, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा सामान्य नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस या घटनेची सखोल तपासणी करत आहे.

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (FC) रोडवर.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: मद्यधुंद अवस्थेत PMPML बस चोरून बेदरकार चालवली.

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: नागरिकांनी बस थांबवून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Drunken youth steals pmpml bus and drives it recklessly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?
1

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
2

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.