कायद्याचे पालन करणे चांगलेच महागात पडले
अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेतर्फे निषेध व मंत्र्यांना निवेदन
अधिकाऱ्यांविरुध्द खाेटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार
मुंबई/नीता परब: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील गुटखा माफियावर कारवाई करणे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) एका अन्न निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. त्या अधिकाऱ्यावर खंडणीसाठी (Crime News) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत संघटनेने आराेप केला आहे की, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रभावाखाली एका त्रयस्थ व्यक्तीने कट रचून हा गुन्हा दाखल केला आहे प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर झालेल्या कायदेशीर कारवाईच्या रागातून ही कारवाई करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राम मुंडे, सचिव गोपाल महोरे, केंद्रीय अन्न अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश माळी यांनी अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करण्यात आले असून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच एफडीए आयुक्तांनी माहिती मिळवण्यासाठी संबंधित पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशीही संपर्क साधला असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.
Jalgaon Crime: दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून; खिशातील लग्नपत्रिकेमुळे हत्येचा उलगडा
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यां विरुध्द खाेटा खंडणीचा गुन्हा दाखल
अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. राम मुंडे यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये वर्णन केलेल्या घटना आणि घटनाक्रम वास्तवाशी जुळत नाहीत. संबंधित घटनेच्या वेळी, प्रतिबंधित खाद्यपदार्थांवरील कारवाईसाठी पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी संबंधित अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, संघटनेने पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारदार, संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच गुटखा तस्करीवरील कारवाईदरम्यान, संबंधित लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला होता. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केल्यास हे प्रकरण पूर्णपणे खोटे आणि सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे उघड होईल, असे डाॅ. राम मुंडे सांगतात.
Jalgaon Crime: शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने घेतला गळफास, दोन चिमुकली पोरकी; गावात हळहळ
संघटनेच्या प्रमुख मागण्या :
-एरंडोल येथील खोटा खंडणी गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा.
– संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना संपूर्ण संरक्षण व न्याय मिळावा.
– भविष्यात अशा कारवायांदरम्यान अनिवार्य पोलीस संरक्षण देण्याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत.
– अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले व दबाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात.
– प्रतिबंधित अन्न पदार्थांवरील कारवाईसाठी मुख्यालय स्तरावरून स्पष्ट कार्यपद्धती एसओपी जाहीर करण्यात यावी.
– खोटे गुन्हे नोंदविण्यात येऊ नयेत याबाबत पोलीस यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.






