Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धाचीच केली हत्या; डोक्यावर दगडाने वार केले अन्…

आरोपीला अवघ्या एका तासात अटक करण्यात आली असून, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र याने विश्वनाथ यांच्या डोक्यावर दगडाने वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 15, 2026 | 08:03 AM
प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

Follow Us
Follow Us:

वरोरा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाची हत्या करण्यात आली. शेगाव येथील आष्टा बायपास रोडवर नालेसफाईचे काम सुरू असताना दोन कामगारांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्धावर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली.

विश्वनाथ परसराम कांबळी (वय ६५, रा. शेगवा) असे मृतकाचे नाव असून, महेंद्र रमेश भुरे (वय ३६ रा. दहेगाव जि. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अवघ्या एका तासात अटक करण्यात आली असून, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र याने विश्वनाथ यांच्या डोक्यावर दगडाने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शेगाव पोलीस यांनी तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीस अटक केली.

दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी चिमूर येथील फॉरेन्सिक पथक व चंद्रपूरची एलसीबी घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करत आहेत.

ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आरोपी शेगाव येथे नालेसफाईचे काम करत होता. विशेष म्हणजे हा नालेसफाईचा ठेका माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या निकटवर्तीय ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित ठेकेदाराकडे कामगारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले असून चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ठेकेदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RPI च्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या

आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे.

पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Web Title: Elderly man murdered while trying to resolve a dispute incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Murder Case

संबंधित बातम्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
1

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
3

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
4

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.