Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मंत्र्याच्या कार्यालयात मी नोकरीला…’; महसूल मंत्र्यांच्या नावाने काळाबाजार, युवकाची 40 लाखांची फसवणूक

तक्रारदार खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ पासून आरोपी रणजित कुंभार याने तक्रारदार यांचे भाऊ व अन्य दोन नातलग यांना क्लार्क व मंत्रालयातील शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 05:51 PM
‘मंत्र्याच्या कार्यालयात मी नोकरीला…’; महसूल मंत्र्यांच्या नावाने काळाबाजार, युवकाची 40 लाखांची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:
महसूल विभागात नोकरीच्या अमिषाने ४० लाखांची फसवणूक
जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बनावट निवड आदेश पाठवून केली दिशाभूल

जत: महसूल मंत्र्याच्या कार्यालयात मी नोकरीला असून मी तुम्हाला मंत्रालयात क्लार्क या पदावर शासकीय नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून तब्बल ४० लाख रुपयेची फसवणूक (Crime News) केल्याप्रकरणी रणजित तुकाराम कुंभार (वय ४० रा. भोसे, ता. पंढरपूर) याच्याविरोधात जत पोलीस (Jat) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित खिलारे कुटुंबीयांच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून कुंभार यांच्या विरोधात फसवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आमिष दाखवून फसवणूक, विश्वासघात करणे, बनावट कागदपत्रांची निर्मिती या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची फसवणूक ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२५ या दोन वर्षाच्या कालावधीत झाली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणांनी जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून अनेक युवकांनी जत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे, अजून ६ जणांचे पैसे घेतलेची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Accident News: कुंभार्ली घाटात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षात बसलेली महिला थेट…
याबाबत अधिक माहिती अशी, संशयीत आरोपी रणजित कुंभार यांनी सागर मच्छिंद्र खिलारे, व चुलत भाऊ व नातलग मधील एकास असे तिघांना चुलत भावाला क्लार्क तसेच मंत्रालयात शिपाई पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगून मोठी रक्कम स्वीकारली. पैशांचे व्यवहार टप्याटप्याने रोख व बँकेमार्फत झाले. त्यानंतर संशयित रणजीत कुंभार याने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या नावाने बनावट निवड आदेश देखील पाठवले. आदेश लवकर मिळतील असे सांगूनही प्रत्यक्षात कोणतीही निवड न झाल्याने ही बाब तक्रारदारांच्या लक्षात येताच आमची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच आरोपीने इतर व्यक्तीकडूनही परवाना मिळवून देतो असे सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचे चर्चा आहे. यामुळे फसवणुकीचे रॉकेट मोठं असल्याची शक्यता आहे.
नोकरीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले
तक्रारदार खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ पासून आरोपी रणजित कुंभार याने तक्रारदार यांचे भाऊ व अन्य दोन नातलग यांना क्लार्क व मंत्रालयातील शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. या बदल्यात त्याने टप्प्याटप्याने रोख व बँक खात्यातून एकूण ४० लाख रुपये घेतले. या सर्व व्यवहारासंबंधी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांची बैंक स्टेटमेंटसुद्धा पोलिसांकडे सादर करण्यात आली आहेत. बहुतांशी रक्कम तीन बँकेत जमा केले आहे उर्वरित रोखीने घेतली आहे. याप्रकरणी आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

बनावट निवड आदेश पाठवून केली दिशाभूल

डिसेंबर २०२४ रोजी आरोपी रणजीत कुंभार याने खिलारे यांना जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या नावाने बनावट निवडसूची व्हॉट्सअॅपवर पाठवली. यात खिलारे यांच्यातील दोघांची निवड झाल्याचे दाखवण्यात आले होते. हे आदेश ३० एप्रिल २०१५ रोजी मिळतील असे सांगण्यात आले. मात्र तसे न झाल्याने खिलारे यांनी वारंवार संपर्क साधला असता आरोपीने टाळाटाळ केलीः या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे करत आहेत.

20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

फसवणुकीची व्याप्ती मोठी
संशयित भामटा रणजीत कुंभार याने चक्क महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव वापरल्याचे पुढे आले आहे. तसे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी, फसवणुकीचा व्याप्ती मोठी असून तालुक्यातील युवकांना नोकरी लावतो, मद्य विक्री परवाना काढून देतो, असे कोट्यवधीचा गंडा घातल्याचे चर्चा सुरू आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात या फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Extortion of rs 40 lakh by the employee in revenue department jat crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Jat taluka

संबंधित बातम्या

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?
1

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना
2

पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल
3

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा
4

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.