Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कोरेगाव) येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची WhatsApp वर आलेल्या बनावट 'RTO Challan' APK फाईलमुळे 7 लाख 63 हजार 600 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. फाईल उघडल्यानंतर मोबाईल हॅक झाल्याचा संशय असून आरोपींनी बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 03:56 PM
RTO Challan'च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

RTO Challan'च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

Follow Us
Follow Us:
  • सातारामध्ये धक्कादायक सायबर फसवणूक
  • बनावट APK फाईलमुळे ज्येष्ठ नागरिक गमावले लाखो रुपये
  • APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास
कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कोरेगाव) येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सर्जेराव व्यंकट नलगे यांची WhatsApp वर आलेल्या बनावट ‘RTO Challan’ नावाच्या APK फाईलमुळे 7 लाख 63 हजार 600 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

WhatsApp वर आली APK फाईल

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी सर्जेराव नलगे हे घरी असताना त्यांच्या WhatsApp वर परदेशी क्रमांकावरून ‘RTO Challan’ नावाची APK फाईल आली. ती अधिकृत संदेश असल्याचे समजून त्यांनी फाईल उघडली. फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलची स्क्रीन अचानक काळी पडली.

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

दुसऱ्याच दिवशी बँकेचा फोन

दुसऱ्या दिवशी HDFC बँकेकडून नलगे यांना फोन आला. त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याची माहिती बँकेने दिली. नलगे यांनी असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे सांगितल्यानंतर खात्याचे स्टेटमेंट तपासण्यात आले.

खात्यातून 7.63 लाख रुपये गायब

तपासात त्यांच्या खात्यातून खालीलप्रमाणे व्यवहार झाल्याचे समोर आले:

1 लाख 96 हजार 200 रुपयांचे तीन व्यवहार

1 लाख रुपयांचा एक व्यवहार

75 हजार रुपयांचा एक व्यवहार

अशाप्रकारे एकूण 7 लाख 63 हजार 600 रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्यात आले.

APK फाईलमुळे मोबाईल हॅक झाल्याचा संशय

नलगे यांच्या लक्षात आले की, WhatsApp वर आलेली APK फाईल उघडल्यानंतरच ही फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

  • या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
  • अनोळखी क्रमांकावरून आलेल्या APK फाईल कधीही उघडू नका.
  • संशयास्पद लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
  • कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नका.
  • अशा प्रकारचे संदेश आल्यास ते त्वरित डिलीट करा.
  • आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 सायबर हेल्पलाइन किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
सायबर तज्ज्ञांच्या मते, APK फाईलद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करून बँकिंग अॅप, OTP, स्क्रीन आणि इतर संवेदनशील माहितीवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे अशा फाईल्सपासून विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Web Title: Fake rto challan apk scam satara senior citizen loses rs 7 63 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • crime
  • cyber
  • police
  • RTO

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.