काय घडलं नेमकं?
मृतक अंजनाबाईचा विवाह २०२२ माह्ये शेखर पाटील याच्याशी झाला होता. शेखर हा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. या दाम्पत्याला ११ महिन्यांची एक लहान मुलगी देखील आहे. सुखी संसार सुरु असतांना अचानक अंजाबाईने आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
माहेरच्यांनी केला गंभीर आरोप
मृतकाचे वडील विजयकुमार यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहे. सासरच्या मंडळींकडून अंजनाबाईचा केवळ मानसिक छळच नाही तर तिला वेश्या व्यवसायासाठी देखील भाग पाडले जात होते. या अनैतिक मागणीला अंजनाबाईचा विरोध होता. तसेच पती शेखर हा व्यवसायानिमित्त रात्री उशिरा 11 ते 12 च्या सुमारास घरी परतत असे, ज्यावर तिने आक्षेप घेतला होता. ही बाब तिने सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत यांनाही सांगितली होती, मात्र तिला न्याय मिळण्याऐवजी तिचा छळ वाढला.
हत्या की आत्महत्या
पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. अंजनाबाईने खरोखरच आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Ans: कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात.
Ans: सासरच्यांनी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती व मानसिक छळ केल्याचा आरोप.
Ans: गुन्हा दाखल करून मृत्यू आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू केला आहे.






