
crime (फोटो सौजन्य: social media)
नाशिक: नाशिकच्या मालेगाव शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात गोळीबार आणि हाणामारी देखील करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, लहान मुलांमध्ये किरकोळ भांडण झाला होता. याचा राग संशयित मेहताब अली याने मनात धरला आणि सुमारे 10 ते 12 जणांना सोबत घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या घरासमोर हल्ला चढवला. संशयित मेहताब अलीने दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, मात्र सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने तो थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर फिर्यादीच्या घरात घुसून तोडफोड केली.
दहशहत निर्माण करण्याचा प्रयत्न
या हल्ल्या दरम्यान काही जणांच्या हातात दोन तलवारी असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. हाणामारी दरम्यान घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल आणि चारचाकींचे नुकसान करण्यात आले. या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल फोन व तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम गायब झाल्याचेही समोर आले आहे. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला.
मुख्य आरोपी ताब्यात
या घटनेननंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मालेगाव पोलीस माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुख्य आरोपी मेहताब अलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या स्लोगननुसार ग्रामीण पोलीस अॅक्शन मोडवर आहे. जिल्हयातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन, सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध तसे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरुन होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालीत असतांना दोन परप्रांतीय व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांची अंगझडती व बॅगा तपासले असता बॅगेत दहा लाख रुपये लाख रपये बनावट चलनी नोटा आढळून आल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघा संशीयतांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.