Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत

खरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्या प्रकरणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत वाढ झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 19, 2025 | 08:45 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • केशव थोरातांच्या आत्महत्या प्रकरणाला मोठे वळण
  • मुळा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत
  • जबाजी गणपत फाटके यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल
शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील बीटभट्टी व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जबाजी गणपत फाटके यांच्यासह सात जणांविरुद्ध शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

१० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता खरवंडी येथील शेडमध्ये गळफास घेऊन थोरात यांनी आत्महत्या केली होती. त्यांचे चिरंजीव अरुण थोरात यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, थोरात यांच्या कागदपत्रांमध्ये आढळलेल्या एका पत्रामुळे प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली.

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

या पत्रात थोरात यांनी समता शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद, आर्थिक अनियमितता, व्यवहारांतील ताणतणाव आणि संस्थेतील काही व्यक्तींनी केल्याचा आरोप असलेल्या मानसिक छळाचा तपशील नमूद केला आहे. थोरात अध्यक्ष असताना त्यांनी आबासाहेब फाटके, भरत फाटके, जयवंत लिपाणे, मच्छिंद्र शिंदे, बन्सी म्हस्के आणि गोरक्षनाथ कुन्हे यांना संस्थेत सभासद केले होते. परंतु नंतर संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी या गटाने प्रयत्न केल्याचा उल्लेख पत्रात आहे.

थोरात यांनी संस्थेशी संबंधित वादात दिवाणी दावे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रिया आणि त्यानंतर झालेल्या समझोत्यामध्ये आपले सर्व दावे मागे घेतले होते. खर्च परत देण्याचे वचनही संबंधितांनी पाळले नसल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि सततच्या मानसिक छळामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचे अरुण थोरात यांनी नमूद केले आहे.

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

फिर्यादीवरून पोलिसांनी जबाजी फाटके आणि आबासाहेब फाटके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिशिंगणापूर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

प्रकरणातील नवे कंगोरे उघड होण्याची शक्यता

तपासादरम्यान या प्रकरणात आणखी अनेक पैलू उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही बाब एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.

गंभीर आरोप : पैसे देऊन चेंज रिपोर्ट मंजूर?

शिक्षण संस्थेत २६ ऐवजी ४८ सभासद दाखवून खोटे प्रोसिडिंग तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय, दहा लाख रुपये संबंधित अधिकाऱ्यांना देऊन चेंज रिपोर्ट मंजूर करून घेतल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे.

 

Web Title: Former vice president of cooperative sugar factory in trouble in thorat suicide case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
1

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती
2

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
3

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Ahilyanagar News: सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत, विखे पिता-पुत्रांवर केली टीका
4

Ahilyanagar News: सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत, विखे पिता-पुत्रांवर केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.