Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; भोंदूने ‘मी शंकर, तू पार्वती…’ म्हणत अत्याचार

वसई संस्थेचा प्रमुख ऋषिकेशशी २०२३ मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. तिच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तिला भेटायला तो पुण्यात गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 08:26 AM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

पालघर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. 200 पेक्षा जास्त महिलांसोबतचे अश्लिल व्हिडिओ समोर आले आहेत. याप्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिलेली असतानाच आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. ‘मी शंकर आणि तू माझी पार्वती आहेस, असे सांगून महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्यविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पुण्यातील ३५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. वसई संस्थेचा प्रमुख ऋषिकेशशी २०२३ मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. तिच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तिला भेटायला तो पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस, असे म्हणत त्याने तिला भुलवले. नंतर पुण्याच्या मांजरीतील लॉजमध्ये नेले आणि गुंगीचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

भोंदूबाबा खरातचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी आरोपी ऋषिकेशने तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढली. त्याआधारे ब्लॅकमेल करून त्याने तिला पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग केला.

राजापुरातही तरुणीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, राजापुरातील एका अल्पवयीन मुलीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची पाश्र्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले. तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.

हेदेखील वाचा : विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Web Title: Fraudulent man abuses woman in vasai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.