Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यानगरी ते पिस्तूलनगरी..! चौदा वर्षांत १४०० पिस्तूल जप्त; १८४० जणांना अटक

पुण्याला विद्यानगरी म्हणून ओळखले जातात. मात्र पुणे आता विद्यानगरी नसून तर पिस्तूल नगरी झाली आहे. सर्रास पिस्तूल विकले जात आहे आणि पोलिसांनी जप्त केले आहे. त्याची आकडेवारी कमी नसून जास्त आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2025 | 04:16 PM
विद्यानगरी ते पिस्तूलनगरी..! चौदा वर्षांत १४०० पिस्तूल जप्त; १८४० जणांना अटक

विद्यानगरी ते पिस्तूलनगरी..! चौदा वर्षांत १४०० पिस्तूल जप्त; १८४० जणांना अटक

Follow Us
Close
Follow Us:

विद्यानगरी ते ‘पिस्तूल नगरी’ अशी ओळख निर्माण करत पुण्यातील गुंडानी ‘साऊथ’च्या चित्रापटाप्रमाणे गुन्हेगारीकडे वळू लागल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या बड्या खूनांमध्ये पिस्तूलांचा प्रकर्षाने वापर झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

Mumbai BMC : मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे खांदेपालट; 7 उपयुक्तांसह 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

गेल्या चौदा वर्षात म्हणजेच, २०११ ते २०२५ या कालावधीत पुण्यातून तब्बल १४०० पिस्तूले जप्त केली असून, १८३९ जणांना अटक करण्यात आली आहे. या पोलिस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारून पिस्तूल धाऱ्यांचा आलेख वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कधी काळी असलेली विद्यानगरी आता पिस्तूलनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

शहराच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरत असलेले पिस्तूल ‘विद्यानगरीत’ सहजतेने उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. हे पिस्तूल वापरणारे सराईतच गुन्हेगार आहेत, असेही नाही. नव्या कोऱ्या पोरांच्या हातात देखील पिस्तूल देऊन त्यांना या गुन्हेगारीच्या दलदलीत टाकले जात आहे. तरुणाईला असलेल्या पिस्तुलाच्या आकर्षणातून ते पिस्तूल बाळगण्यासाठी वाट्टेल ते करत असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, वाढलेल्या घटनांना आवर घालण्यासाठी तसेच बेकायदा पिस्तुलांचा चाप लावण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच वर्षात ( २०२० ते २०२५) पोलिसांनी ४५० पिस्तूल पकडले असली तरी न पकडलेल्या पिस्तूलांचा आकडा किती असेल हा प्रश्नच आहे.

परराज्यातून पिस्तूल पुण्यात
पिस्तूल विक्री करणारे रॅकेटच सक्रिय असून, ते परराज्यातून स्वस्थात पिस्तूल आणत पुण्यात दुप्पट ते तिपट्ट किंमतीने विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून बक्कळ पैसा देखील मिळविला आहे. परराज्यात पिस्तूल अगदीच स्वस्थ मिळतात. बिहार, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातून हे पिस्तूल आणले जातात. त्याठिकाणी ५ हजारांपासून पिस्तूल मिळते. तेच पिस्तूल पुण्यात हवे तसे व गरजेनुसार किंमतीने विकले जाते. त्यात पिस्तूल घेऊन येणे सोपे आहे. दुचाकी व वाहनांमध्ये सहजरित्या आणले जाते. पुर्वी पुण्यापर्यंत पिस्तूल पुरवणारे एक रॅकेट होते. ते पुण्यात विक्री करणारे दुसरे रॅकेट. पण, आता परिस्थिती बदलली आहे. काही गुन्हेगार तर थेट पिस्तूल खरेदीलाच परराज्यात जात असल्याचे दिसून आले आहे.

पिस्तूलांचा वापर वाढला !
पुण्याच्या गुन्हेगारीचा कोयता पॅटर्न तसा राज्यभरात प्रसिद्ध आहे. असे असले तरी आता कोयत्यासोबतच पिस्तूलाने ढिशक्यांव-ढिशक्यांव करण्याचाही पॅटर्न फोफावला आहे. त्याचे कारणही तसे आहे, गुन्हेगारी वर्तळातील मतानुसार कोयत्याने मारले अन् नंतर तो ‘वाचला’ असे नको म्हणून आधी गोळ्या झाडल्या जातात. नंतर कोयत्याने तोडण्यात येते, असे सांगितले जाते. कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. नंतर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना देखील गोळ्या झाडून व नंतर कोयत्याने वारकरून मारण्यात आले. सोबतच पिस्तूलांमधून अधून-मधून दहशतीसाठी गोळ्या झाडल्या जातात.

नुकत्याच घडलेल्या शहरातील काही घटना
■ वाडेबोल्हाईत किरकोळ वादानंतर हवेत गोळीबार
■ कोथरूडमध्ये पुर्ववैमन्यासातून तरुणाचा खून, गोळीबारही
■ बिबवेवाडीत वैमनस्यातून जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार
■ कोंढव्यात दोन गुन्हेगारांच्या बैठकीत चुकून झालेला गोळीबार
■ पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्…

Web Title: From education hub to gun city 1400 pistols seized in 14 years 1840 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • crime
  • Maharashtra. Pune
  • police

संबंधित बातम्या

Bandra Demolition : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर
1

Bandra Demolition : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक
2

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक

Rajasthan Crime: मानवतेला काळिमा! आईनेच 8 महिन्यांच्या चिमुरडीला पाजला ॲसिड; तोंडातुन व नाकातून रक्त …
3

Rajasthan Crime: मानवतेला काळिमा! आईनेच 8 महिन्यांच्या चिमुरडीला पाजला ॲसिड; तोंडातुन व नाकातून रक्त …

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार
4

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.