Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

अकोला शहरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राला बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना उघड झाली आहे. संशय टाळण्यासाठी आरोपीने जखमी मित्राला अपघात झाल्याचा बनाव करत रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासांत खुनाचा उलगडा करून मुख्य आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 06:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर मित्राने मित्राला बेदम मारहाण केली.
  • अपघाताचा बनाव करून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
  • स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे तीन तासांत आरोपीला अटक केली.
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. पैशाच्या व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आधी मारहाण केली आणि नंतर संशय येऊ नये म्हणून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना जखमी तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे काही काळ हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचेच चित्र निर्माण झाले. मात्र पोलिसांना या घटनेबाबत संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा तीन तासांत उलगडा केला.

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

काय घडलं नेमकं?

गंबीर जखमी अवस्थेत एका युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींकडून हा अपघात असल्याचे सांगण्यात आले. मात्र मृतकाच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना संशय आला. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरु केली. तपासादरम्यान मृतकाच्या अंगावरील जखमा या अपघातामुळे नव्हे, तर मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशीची दिशा बदलत पैशाच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले. चौकशीत मित्रांमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.

तपास सुरु

या कारवाईमुळे अपघाताचा बनाव करून खुनाचे सत्य लपवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का, मारहाणीचे नेमके कारण काय होते आणि आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काय होते, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अकोल्यातील या घटनेमागील कारण काय होते?

    Ans: पैशांच्या व्यवहारातील वाद.

  • Que: आरोपीने खून लपवण्यासाठी काय केले?

    Ans: अपघाताचा बनाव करून जखमीला रुग्णालयात दाखल केले.

  • Que: पोलिसांनी आरोपीला किती वेळात अटक केली?

    Ans: अवघ्या तीन तासांत.

Web Title: Akola crime friend murdered over money dispute admitted to hospital after faking an accident but police unraveled the conspiracy within 3 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
1

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा
2

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा
3

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण
4

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.