Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथे शेतजमिनीच्या हद्दीच्या वादातून दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तलवार आणि दगडाने झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 01:08 PM
बाईकवरून चोरटे आले अन् मोबाईल चोरून घेऊन गेले; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच...

बाईकवरून चोरटे आले अन् मोबाईल चोरून घेऊन गेले; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच...

Follow Us
Follow Us:
  • शेतजमिनीच्या हद्दीच्या वादातून दोन गटांमध्ये तलवार आणि दगडाने हल्ला.
  • जीवघेण्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी.
  • दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; कुरळप पोलीस पुढील तपास करत आहेत.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या हद्दीच्या वादाने बुधवारी हिंसक वळण घेतले. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर तलवार व दगडांनी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घडलेली घटना वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील आहे.

काय नेमकं प्रकरण?

बुधवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास येडेनिपाणी गावातील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. शेतजमिनीच्या हद्दीचा आणि शेतातील हत्तीगवत काढण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून प्रमोद जाधव यांनी शिवाजी पाटील यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समजल्यानंतर किशोर पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वाद अधिकच चिघळला आणि आरोपीने घरातून तलवार आणत “तुम्हाला आता जिवंत ठेवत नाही” अशी धमकी देत हल्ला केला. शिवाजी पाटील यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार अडवताना बाजीराव हणमंत पाटील यांच्या उजव्या हाताच्या पंजावर गंभीर जखम झाली.

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा

त्यानंतर प्रमोद जाधव यांनी शिवाजी पाटील यांच्या हातावर व पाठीवर, अरुण पाटील यांच्या मनगटावर व कपाळावर, प्रवीण पाटील यांच्या नाकावर तसेच विजयकुमार पाटील यांच्या डाव्या हातावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

गुन्हा दाखल

विनायक जाधव यांनी हातातील दगडाने मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी किशोर बाजीराव पाटील (रा. येडेनिपाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद शिवाजी जाधव (आलुगडे) व विनायक शिवाजी जाधव (आलुगडे, दोघे रा. येडेनिपाणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: येडेनिपाणी, ता. वाळवा (सांगली).

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: शेतजमिनीची हद्द आणि हत्तीगवत काढण्याचा वाद.

  • Que: या प्रकरणात किती जण जखमी झाले?

    Ans: एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले.

Web Title: Sangli crime dispute over farm boundaries takes a bloody turn five seriously injured in a frenzied sword attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
1

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक
2

Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान
3

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान

Sangli News: सांगली महापालिकेतील ३५ कोटींच्या भूखंड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले
4

Sangli News: सांगली महापालिकेतील ३५ कोटींच्या भूखंड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.