Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या एका चोरट्याला फुरसूंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 11:46 AM
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी 'तो' झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी 'तो' झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी झाला चोर
  • फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
  • शेजाऱ्याचेच घर फोडल्याने चर्चा रंगली
पुणे : नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या एका चोरट्याला फुरसूंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शेजाऱ्याचेच घर फोडल्याने तसेच नर्तकीसाठी चोर झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ६ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिणे जप्त करण्यात आले होते. त्याने हे दागिणे एका सोनाराकडे विक्री केले होते.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या पथकाने केली आहे. होळकरवाडी येथील राहणारे अभिजित पठारे यांच्या घरात चोरी झाली होती. विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केला होता. दरम्यान, याप्रकरणी, अभिजित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फुरसूंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस तपास करत होते.

पोलिस कर्मचारी सागर वणवे व अभिजित टिळेकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की ही चोरी राहुल पठारे याने केली असून, काही सोने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विक्री केले आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. चौकशीत राहुलने सांगितले की, त्याला नर्तकीसोबतच्या बैठकीचा आणि नाचगाण्याचा छंद आहे. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. अधिक तपासात त्याने गुन्ह्याची कबूली दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

घरफोडीचा झाला उलगडा

अभिजित आणि आरोपी राहुल हे एकाच परिसरात राहतात. राहुलचे अभिजित यांच्या घरी येणे- जाणे असते. त्यातूनच त्याने संधी मिळताच अभिजित यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केली. सुरूवातीला राहुल बाबात कोणी काही बोलायला तयार नव्हते. परंतू पोलिसांनी तांत्रिक विश्लेषन आणि गोपनिय बातमीदरामार्फत तपास करून राहुलला असलेल्या नर्तकीच्या छंदाची माहिती गोळा केली. त्यातून पुढे या घरफोडीचा उलगडा झाला. चोरीच्या ऐवजाबाबत राहुल याला विचारले असता त्याने सांगितले, चोरीतील काही सोने महंमदवाडी येथील एका सराफ पेढीत विक्री केली आहे. त्यातून आलेले ३० हजार रुपये स्वतःवर खर्ची केले होते.

Web Title: Fursungi police have arrested a thief who broke into a house and stole gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
1

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…
2

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
3

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
4

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.