Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात

नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध सुरु झाले. दोन्ही गँगमधील मयत आणि साथीदार हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 06:05 PM
Gang War Between the Sai Lala Gang and the Sada Gang in Nanded Crime News

Gang War Between the Sai Lala Gang and the Sada Gang in Nanded Crime News

Follow Us
Follow Us:

Nanded Crime News : नांदेड : शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या गॅंगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना एका मयताच्या भावाने चाकूने वार करून एकाला संपविले. नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध सुरु झाले. दोन्ही गँगमधील मयत आणि साथीदार हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हद्दपारी, एमपीडीए अंतर्गतही गुन्हे (Crime News) दाखल आहेत.

अलिकडच्या  काळात शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून पुन्हा एकदा गँगवॉरचे सावट गडद झाले आहे. दोन-तीन दिवसांत घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांत लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, शहराची ओळखच बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल पोस्ट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

याशिवाय, गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष आणि वर्चस्वासाठी सुरू असलेली चढाओढ ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. काही टोळ्यांमध्ये जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक वर्चस्व या कारणांमुळे उफाळून येणारे संघर्ष थेट हिंसाचारात परिवर्तित होत आहेत. परिणामी, संवेदनशील भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असून, सामान्य नागरिक यामध्ये बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई, सतत गस्त, तसेच संशयितांवर नजर ठेवणे यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, युवकांना सकारात्मक दिशादर्शन, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक प्रबोधन यावरही भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकूणच, नांदेडमध्ये वाढती गुन्हेगारी आणि गँगवॉरचे वातावरण शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, प्रशासन आणि समाज या दोघांनीही एकत्रितपणे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा :  शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

गोदावरीत टिप्पर पलटला; क्लीनर झाला ठार

मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पुलावरून नदीपात्रात आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून अवैध वाळू वाहतूक करत असलेला टिप्पर अचानक पलटल्याने गाडीचा क्लिनर जागीच ठार झाला असून चालक मात्र थोडक्यात बचावला असल्याची घटना महाटी शिवारात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टिप्पर हा अवैध वाळूची भरधाव वेगात वाळूची वाहतूक करताना तोल जाऊन गोदावरी नदीत पलटला असून अपघात इतका भीषण होता की, टिप्परचा क्लिनर सुभाष  मोरे वय ५० रा. नांदेड यांचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला, तर चालकाने प्रसंगावधान राखत जीव वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. मुदखेड ग्रीन झोन पट्टधात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून जिल्हा प्रशासनाकडून या प्रकाराकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, तीन निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. मुदखेड परिसरात होणाऱ्या अवैध वाहतुकीवर जिल्हाप्प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबवावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Gang war between the sai lala gang and the sada gang in nanded crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • crime news
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
1

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
3

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
4

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.