संग्रहित फोटो
शहरात ४४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या माध्यमातून गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवले जाते. गुन्हे शाखेअंतर्गत सहा युनिट्स, तसेच खंडणीविरोधी, अंमली पदार्थ विरोधी, आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी अशी प्रत्येकी दोन मिळून एकूण १२ पथके कार्यरत आहेत. ही सर्व पथके गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करत आहेत.
या नव्या पुनर्वाटपानुसार गुन्हे शाखेच्या चार एसीपींमध्ये जबाबदारींचे विभाजन केले आहे. त्यानुसार सहायक आयुक्त एक अंतर्गत युनिट एक ते तीन, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचा समावेश आहे. तर, एसीपी दोन अंतर्गत युनिट चार ते सात तसेच दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक दोन असेल. एसीपी तीन अंतर्गत खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथक एक आणि दोन यांचा समावेश आहे. तर, प्रशासन, भरोसा सेल, एएचटीयू (मानव तस्करी प्रतिबंधक युनिट) हे एसीपी चार यांच्या अखत्यारीत असणार आहे. नव्या बदलामुळे गुन्हे शाखेचे कामकाज अधिक समन्वयित, झोननिहाय आणि परिणामकारक होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : 5 कोटी रुपये द्या, नाहीतर…; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी
परिमंडळनिहाय युनिट
पुणे शहरात सध्या ४४ पोलिस ठाणी आहेत. याचे विभाजन ७ परिमंडळात करण्यात आले आहे. त्यातच आता गुन्हे शाखेचे ७ युनिट झाल्याने प्रत्येक परिमंडळासाठी एक युनिट कार्यरत असणार आहे. तसेच, नव्या रचनेत खंडणी, अंमली पदार्थ विरोधी पथकासाठी एक एसीपी असणार आहे.






