Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Cylinder: धक्कादायक! लांजा शहरातून चक्क गॅस सिलेंडरची चोरी

लांजा शहरातील बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या सिलिंडर चोरीच्या घटनेमुळे संबंधित व्यवसायिक अडचणीत आले असून गॅस सिलिंडरच्या तुटवड्‌यामुळे सिलिंडर चोरटे वावरू लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 03:04 PM
LPG Gas Cylinder: धक्कादायक! लांजा शहरातून चक्क गॅस सिलेंडरची चोरी

LPG Gas Cylinder: धक्कादायक! लांजा शहरातून चक्क गॅस सिलेंडरची चोरी

Follow Us
Follow Us:

लांजा शहरात गॅस सिलिंडर गेले चोरीला
शहरातील बाजारपेठेत घडली घटना 
व्यावसायिकांसमोर निर्माण झाली अडचण

लांजा: लांजा शहरातील बाजारपेठ परिसरातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन हातगाडी व्यवसायिकांचे गॅस सिलिंडर चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. एकीकडे गॅस सिलिंडरची टंचाई असताना दुसरीकडे मात्र ऐन टंचाईवेळी चोरी झाल्याने संबंधित व्यवसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. लांजा बाजारपेठेमधील दोन हातगाडी व्यवसायिकांच्या गाड्यांवर असलेले गॅस सिलिंडर चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास (Crime) लंपास केले.

यामध्ये चोरी झालेल्या एका व्यवसायिकाची हातगाडी भूमी अभिलेख कार्यालयासमोर असते, तर दुसऱ्या व्यवसायिकाची हातगाडी साई लॉज समोर असते. रविवारी (दि. १५) सकाळी संबंधित व्यावसायिक आपल्या हातगाडीकडे आले असता गॅस सिलिंडर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, लांजा शहरातील बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या सिलिंडर चोरीच्या घटनेमुळे संबंधित व्यवसायिक अडचणीत आले असून गॅस सिलिंडरच्या तुटवड्‌यामुळे सिलिंडर चोरटे वावरू लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

गॅस तुटवड्याविरोधात वाई तालुका काँग्रेस नेते आक्रमक

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आखाती देशातील युद्धाचे कारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अन्यायी दरवाढीचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी वाई तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने काल , सोमवार १६ मार्च २०२६ रोजी वाईत चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.

चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध; गॅस तुटवड्याविरोधात वाई तालुका काँग्रेस नेते आक्रमक

वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले. नरेंदर सरेंडर, भाजपा सरकारचा जाहीर निषेध, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

भाजीपाला बाजाराला बसला फटका

इराण-इस्रायल युद्धाची झळ आता थेट भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी कच्च्या मालाची निर्यात पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारात पडून आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असून, भावातही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे, वाढत्या भावांमुळे विक्रेते चिंतेत आहेत, कारण ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीमुळेच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसत आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याच्या पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही दुहेरी फटका बसला आहे.

 

Web Title: Gas cylinder stolen right from the town of lanja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • crime news
  • Iran Israel Conflict
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.