Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्चभ्रू कुटुंबातील मुले-मुली नशेच्या आहारी; तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार

ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. मात्र, हे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नाहीत. संशयित हर्षलने मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने नशेच्या आहारी नेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2026 | 12:11 PM
गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

Follow Us
Follow Us:

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील एका प्रख्यात अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या दोन उच्चभ्रू कुटुंबातील मुला-मुलींचे प्रेमसंबंध नशेच्या आहारी गेल्याने थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी गंगापूर धरण परिसरातील एका नामांकित अकॅडमीत बारावीत शिक्षण घेत आहे. सन २०२५ मध्ये अकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान तिची ओळख संशयित हर्षल बावा (वय २१) याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. मात्र, हे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नाहीत. संशयित हर्षलने मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने नशेच्या आहारी नेले. संशयिताने स्वतःच्या कारमध्ये (एमएच १५ जीएल ६५५७) पीडितेला नेऊन, नशेच्या अंमलाखाली तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Amit Thackeray : “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?” नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल

या प्रकरणातील दोन्ही कुटुंबे सुशिक्षित आणि सधन आहेत. मुलीचे वय १७ वर्षे ८ महिने आहे. हर्षलचे कुटुंब आणि मुलगी लग्नासाठी तयार असले तरी, आईने या विवाहास ठाम नकार दिला आहे. अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिचे आयुष्य उद्धवस्त केल्याचा आरोप आईने केला आहे. ‘स्टेट्स’ आणि पैशाच्या जोरावर मुलांना दिलेली अतिरिक्त मोकळीक पालकांसाठी किती महाग पडू शकते, याचे हे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काजल मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सद्यस्थितीत पीडित मुलीचा ताबा बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आला आहे.

Mumbai Airport Customs : मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; दुबईहून तस्करी करून आणलेले १.८ कोटींचे सोने आणि गॅझेट्स जप्त

लग्नसमारंभातच तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण

दुसऱ्या एका घटनेत, लग्नसमारंभात पाहुण्यांना पंगत वाढणाऱ्या युवकाला दोन जणांनी बेदम मारहाण केली. तुझे नाव पत्रिकेत नाही, मग तू येथे काय करतोस? असा जाब विचारत युवकाला मंडपाबाहेर नेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार वस्तूने मानेवर, छातीवर आणि हातांवर वार करून जखमी केले. ही घटना २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाहू गार्डन परिसरात घडली.

Web Title: Girl abused after being drugged incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?
1

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
2

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
3

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम
4

अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.