Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

मानवतेला आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दौंड तालुक्यातील गर्भपात आणि स्त्री- भ्रूणहत्येच्या रोज समोर येणाऱ्या नवनवीन घटनांनी दौंडसह राज्य हादरून गेले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 04:07 PM
केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 'एसआयटी'ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 'एसआयटी'ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पाटस : मानवतेला आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दौंड तालुक्यातील गर्भपात आणि स्त्री- भ्रूणहत्येच्या रोज समोर येणाऱ्या नवनवीन घटनांनी दौंडसह राज्य हादरून गेले आहे. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघड झालेला हा गर्भपात रॅकेट थांबायचं नाव घेईना, यवत पोलिसांनी पारगाव येथील आणखी एका डॉक्टरला आणि त्याच्या दलालाला गुन्हे दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री- भ्रूणहत्या हा चर्चेचा विषय बनला असून वैद्यकीय क्षेत्रातील हे हैवान आता जनतेसमोर येऊ लागली आहेत.

 

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेट प्रकरणी विशेष तपास पथकाने तपासाची व्याप्ती वाढवून धडक कारवाई केली आहे. डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८ वर्षे, व्यवसाय- डॉक्टर, मंगलमूर्ती हॉस्पिटल, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) व बापूराव पंढरीनाथ जांबले (वय ५७ वर्षे, रा. वासुंदे, ता. दौंड, जि. पुणे) यांना गुन्ह्याच्या सखोल तपासादरम्यान सबळ व कायदेशीर पुरावे गोळा करून पोलिसांनी दिनांक २६ जून २०२६ रोजी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना शनिवारी (दि. २७) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. सुमंत शितोळे हा आरोपी डॉक्टर हा मुख्य आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी याच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान (चाचणी) झालेल्या गरोदर महिलांना आपल्या पारगाव येथील ‘मंगलमूर्ती हॉस्पिटल, येथे आणून त्यांचा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर बापूराव जांबले हा या रॅकेटमध्ये एजंट म्हणून सक्रिय काम करत असल्याचेही पोलीसांनी सांगितले.‌ या बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणारी अत्यंत संवेदनशील व प्रतिबंधित औषधे व इंजेक्शन तो मुख्य आरोपींना गायकवाड हॉस्पिटल येथे पुरवण्याचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा : ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात

दरम्यान, स्त्री-भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान हा आपल्या सामाजिक स्वास्थ्याला मोठा कलंक व घातक ठरणारा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये पडद्यामागून किंवा थेट सहभागी असलेल्या, मदत करणाऱ्या किंवा वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करणाऱ्या इतर कोणत्याही डॉक्टर, एजंट किंवा मध्यस्थांची गय केली जाणार नाही. सामाजिक स्वास्थ्याला बाधक असणाऱ्या अशा सर्व दोषी आरोपींचा शोध घेऊन त्यांना कायद्यानुसार कठोर शासन होईपर्यंत पोलीस प्रशासनाचे अटक सत्र सुरूच राहील. असे आश्वासन यवत पोलीसांनी दिले आहे.

Web Title: The yavat police have arrested two individuals including another doctor from pargaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Daund Crime

संबंधित बातम्या

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
1

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता
2

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
3

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी
4

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.