मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई (Photo Credit- X)
दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये, दुबईहून अमिरातच्या (Emirates) फ्लाईट क्रमांक EK-502 ने आलेल्या दोन प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांकडून एकूण ८४.३७ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, कॉस्मेटिक्स आणि विदेशी सिगारेटचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
तपासणी दरम्यान एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी विमानाची सखोल झडती घेतली. यावेळी विमानातील मागील बाजूच्या दोन्ही शौचालयांमधील कमोडमध्ये तपकिरी रंगाच्या टेपने गुंडाळलेली आठ पाकिटे आढळून आली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पाकिटे लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न कस्टम्सच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे.
Pune Accident : नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरवर कार आदळली अन्…
एका अन्य कारवाईत दुबईहून स्पाईसजेटच्या (SpiceJet) फ्लाईट क्रमांक OSG-5114 ने आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. या प्रवाशाकडून ६९५ ग्रॅम २४ कॅरेट कच्चे सोने जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ९५.३२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला सीमा शुल्क कायदा, १९६२ (Customs Act, 1962) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
कस्टम्स विभागाने जप्त केलेल्या सर्व वस्तूंबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे तस्करीच्या मोठ्या नेटवर्कशी काही संबंध आहेत का आणि त्याचे इतर साथीदार या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावरील कडक बंदोबस्त आणि तांत्रिक तपासणीमुळे तस्करीचे हे मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात कस्टम्सला यश आले आहे.
Pune Murder : दारु पिण्याच्या कारणावरुन वाद; मजुराचा डोक्यात दगड घालून खून






