Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

गणेश आणि काही परिचित आरोपी यांच्यात यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. गुरुवारी रात्री गणेश भांडेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळताच तिघे आरोपी तेथे पोहोचले. सुरुवातीला चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळातच वाद विकोपाला गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 11:51 AM
नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा शहर हादरले आहे. एका घटनेत भांडेवाडी परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली तर दुसऱ्या प्रकरणात नवीन कामठी परिसरात महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.

पहिली घटना भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर येथे गुरुवारी रात्री घडली. गणेश प्रितमलाल बोरकर (वय 40, रा. हनुमाननगर, भांडेवाडी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. तो विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे पत्नी काही काळापूर्वी त्याला सोडून गेल्याची माहिती आहे.

प्राथमिक तपासानुसार, गणेश आणि काही परिचित आरोपी यांच्यात यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. गुरुवारी रात्री गणेश भांडेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळताच तिघे आरोपी तेथे पोहोचले. सुरुवातीला चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळातच वाद विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने गणेशवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला गणेश जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच भांडेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चरडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केली असून, खबऱ्यांचे जाळे आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

कामठीत महिलेचा मृतदेह; पतीवर संशय

दुसरी घटना, नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गादा शिरपूर रोड परिसरात उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. भाग्यश्री राजेंद्र कुतुंगे (४५, रा. गादा) असे मृताचे नाव आहे. भाग्यश्री ही घटस्फोटित असून, तिला १६ वर्षांची मुलगी आहे. तीन महिन्यांपूर्वीच ती मुलीसह परिसरात राहायला आली होती. प्राथमिक तपासात महिलेची हत्या अन्यत्र करून मृतदेह घटनास्थळी आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Web Title: Goon murdered in bhandewadi woman killed in kamptee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : मनपा, पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’
1

Nagpur News : मनपा, पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
2

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…
3

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

Nagpur News : आता वाळू लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
4

Nagpur News : आता वाळू लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.