Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई

घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोर तालुक्यातील शिंद आणि गवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 21, 2026 | 11:26 AM
घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई

घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

भोर : घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोर तालुक्यातील शिंद आणि गवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. महादेव नामदेव सालगुडे (वय ५३, रा. बारामती) असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराला घरकुलाचा दुसरा हप्ता बँकेतून काढून द्यायचा होता. हा हप्ता मिळवून देण्याच्या बदल्यात ग्रामसेवक सालगुडे याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वारंवार होणाऱ्या या मागणीला कंटाळून तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि रीतसर तक्रार नोंदवली.

ही कारवाई एसीबीसाठी आव्हानात्मक ठरली होती. गेल्या दोन महिन्यांत पथकाने सालगुडे याला पकडण्यासाठी तब्बल ८ ते १० वेळा सापळा रचला होता, मात्र प्रत्येक वेळी तो हुलकावणी देत होता. अखेर मंगळवार (दि.१९) रोजी लाचलुचपत विभागाने अत्यंत गोपनीयरीत्या भोलावडे-शिंद रस्त्यावर कीवत (ता.भोर) गावाजवळ सापळा लावला. ठरल्याप्रमाणे १५ हजार रुपये स्वीकारताना पथकाने सालगुडे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

तातडीने त्याला अटक करून भोर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सध्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, त्याच्या इतर मालमत्तेची आणि व्यवहारांची चौकशी लाचलुचपत विभागाकडून केली जाण्याची शक्यता आहे. शासकीय कामासाठी कोणाही अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : दोन सख्ख्या बहिणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, अचानक बिबट्याने झडप घातली अन्…; ओतूरमधील धक्कादायक घटना

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने आणखी एक मोठी कारवाई करत पुण्यातून एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. मनोज शिरुरे असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून, स्वतःच्या मुलासाठी फुटलेला NEET पेपर खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली ही पहिली अटक असल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, डॉ. मनोज शिरुरे यांनी शिवराज मोटेगावकर याच्याकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय आहे. सीबीआयने त्यांना लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: Gram sevak arrested for taking bribe for gharkul scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • ACB
  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
1

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
2

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
3

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.