Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; आजीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं अन् नंतर…

इंदू या धम्म उपासिका होत्या. नेहमी पांढऱ्या साडीत वावरत असत. त्यांना मुलगा आणि दोन मुली असून, सर्वजण विवाहित आहेत. मुलगा अभियंता तर सून शासकीय नोकरीला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 08:05 AM
धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; नंतर स्वत: झाला पसार

धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; नंतर स्वत: झाला पसार

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच नागपुरातही असाच प्रकार घडला. नकळत बँकेतून २० हजार रुपये काढल्यामुळे आजीने नातवाला फटकारले. चोर म्हणून सतत टोमणे देऊ लागली. याचा राग मनात धरून नातवाने धारदार शस्त्राने आजीच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार करून हत्या केली.

इंदू किशोर चव्हाण (वय ६८, रा. लष्करीबाग) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी राज बागडे (वय २४) याला अटक केली आहे. बँकेतून २० हजार रुपये काढल्यामुळे आजीने नातवाला फटकारले. चोर म्हणून सतत टोमणे देऊ लागली. याचा राग मनात धरून नातवाने धारदार शस्त्राने आजीच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार करून हत्या केली. यानंतर मृतदेह घरातच कोंडून पसार झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदू या धम्म उपासिका होत्या. नेहमी पांढऱ्या साडीत वावरत असत. त्यांना मुलगा आणि दोन मुली असून, सर्वजण विवाहित आहेत. मुलगा अभियंता तर सून शासकीय नोकरीला आहे. दोघेही कुटुंबासह बाहेरगावी राहतात. इंदू या शिलाई मशीनचे काम करायच्या. त्यामुळे वरच्या मजल्यावरच राहायच्या. पती किशोर हे खाली राहायचे. शेजारीच राहणारा राज हा त्यांचा चुलत नातू आहे. त्याचे नेहमीच घरी ये-जा होते. आधी तो दुकानात काम करायचा. सध्या रिकामाच होता.

आजीच्या खात्यातून परस्पर काढले 20 हजार

काही दिवसांपूर्वी राजने आजीला फसवून बँक खात्यातील २० हजार रुपये काढले. यामुळे आजी संतापली होती. यावरून तिने नातवाला फटकारले. तिने त्याला ‘चोर’ म्हटले होते. आजीचे शब्द त्याच्या जिव्हारी लागले. सततच्या टोपण्यामुळे तो संतापला होता.

ऑनलाईन चाकू मागवून रचला कट

आजीचा काटा काढण्याचा निर्णय घेत आरोपीने ऑनलाईन चाकू मागवला. गुरुवारी मध्यरात्री तो आजीच्या खोलीत शिरला. त्यावेळी इंदू कपडे शिवत होत्या. आजी काही समजण्याच्या आतच गळ्यावर वार केला. त्यानंतर छाती आणि पोटावर वार केले. यात इंदू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. आजीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी काही वेळ विचार करत थांबला. त्यानंतर त्याने मृतदेह ओढत बाथरूमच्या दिशेने नेला. घराला कुलूप लावले आणि घटनास्थळावरून फरार झाला.

सकाळी उघडकीस आली घटना

शुक्रवारी सकाळ झाली तरी इंदू यांच्या खोलीचे दार बंद होते. पतीने वर जाऊन कुलूप उघडले. समोरचे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सकाळी सुमारे १० वाजता ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सुरू आहे.

Rajapur Crime : चोरी करुन पळालेल्या ‘त्या’ आरोपींची गाडी पोलिसांना सापडली; आयफोनसह सात माेबाईलही हस्तगत

Web Title: Grandson murders grandmother after being called a thief incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…
4

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.