काय घडलं नेमकं?
मृत व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून सेक्टर १०२ मधील ‘जॉयविले सोसायटी’ मध्ये राहत आहे. आपल्या पत्नी आणि मुलीसह या सोसायटीत राहत होती. हे कुटुंब मूळचे दिल्लीतील नांगलोई येथील असून ते दिल्लीतील किरारी भागात त्यांची इयत्ता पाचवीपर्यंतचे एक खासगी शाळा चालवत होते. ही व्यक्ती सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन २३ व्या मजल्यावरील टेरेसवर गेली. तिथे गेल्यानंतर २३ व्य मजल्यावरून आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत उडी मारून आत्महत्या केली.
‘चहा अन् पाव फ्राय…’; बायकोच्या पाठीवर कुकरने मारहाण; कुठे घडली धक्कादायक घटना?
पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बाप-लेकीला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
आत्महत्येचे कारण काय?
मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, कोव्हीड काळापासून त्याला आरोग्याच्या विविध समस्याच भेडसावत होत्या, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या एका डोळ्याची दुर्ष्टी पूर्णपणे गेली होती. तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही कमी होत चालली होती. या शारीरिक व्याधींमुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात आणि चिंतेत होता.
प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन
हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वतःने आत्महत्या केल्याचे धक्कयाक घटना समोर आली आहे. सुनील आणि सिमरन असे या मृत जोडप्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (9 फेब्रुवारी) ला रात्री घडली.
Ans: हरियाणातील गुरुग्राम शहरातील सेक्टर 102 येथील सोसायटीत ही घटना घडली.
Ans: 38 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 2 वर्षांची मुलगी असे दोघे मृत आहेत.
Ans: मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्यांमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.






