
Rajasthan Borewell Accident : 22 तासांपासून मृत्यूशी झुंज! 9 वर्षांच्या भोमारामला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील लोहावट परिसराच्या नौसर गावातील बोअरवेलमध्ये (Rajasthan Borewell Accident) अडकलेल्या 9 वर्षीय भोमारामला बाहेर काढण्यासाठी मागील 22 तासांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भोमाराम जिथे अडकला आहे, त्याच्या जवळपास 15 ते 20 फूटवर एक मोठं दगड असल्याने नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) या पथकासमोर अनेक आव्हान उभी ठाकली आहेत.
प्रशासन या अडथळ्याला दूर करणे आणि मुलापर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध साहित्यांसह अनेक पर्यायांचा वापर करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही बोअरवेल 1,050 फुटांपेक्षा जास्त खोल आहे. तर भोगाराम हा 600 फुटांपेक्षा जास्त आत अडकला आहे. या बोअरवेलमध्ये अनेक ठिकाणी मोठ मोठी दगड असल्याने भोगाराम नेमका कुठं अडकला आहे? याचा पत्ता लावण्यासही अडचणी येत आहेत.
बोअरवेलच्या आत असलेली आद्रता व पाण्यामुळे बचाव पथकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून हे बचावकार्य सुरू होते. त्यानंतर काही काळ थांबल्यानंतर सकाळी बचाव मोहिम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली.
बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलांना खास पद्धतीने बाहेर काढण्यास माहिर असलेल्या मदाराम यांना देखील या बचाव मोहिमेसाठी बोलावण्यात आले आहे. सध्या बचाव पथक मार्गात येणारे दगड हटवण्याचे काम करत आहेत, तर अधिकारी या प्रक्रियेला वेग देण्यासाठी अतिरिक्त उपकरणांच्या वापराचा विचार करत आहेत.
फलोदीचे आमदार पब्बाराम बिश्नोई यांनी घटनास्थळाची पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती घेतली. जिल्हाअधिकारी आणि पोलीस अधिक्षक (एसपी) देखील घटनास्थळी उपस्थित असून घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळावर तैनात असून प्रशासन मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पंचाराम भील यांच्या शेतात बनलेल्या एका बोअरवेलमध्ये झाली. बोअरवेलच्या मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने येथील पंपच्या दुरुस्तीसाठी ती बाहेर काढण्यात आलेली. याच काळात पंचाराम यांचा 9 वर्षांचा मुलगा भोमाराम जवळच खेळताना या बोअरवेलमध्ये पडला.
या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. असे सांगण्यात येत आहे की, भोमाराम आपल्या आई-वडिलांचा एकमेव मुलगा आहे. बचाव पथक व स्थानिक प्रशासन त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
Ans: राजस्थानमधील फलोदी जिल्ह्यातील लोहावट परिसरातील नौसर गावात ही घटना घडली.
Ans: भोमाराम ६०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेलमध्ये अडकला आहे. बोअरवेलची एकूण खोली १,०५० फुटांपेक्षा जास्त असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची पथके बचावकार्यात सहभागी आहेत.