Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ प्रतिबंधक पथकास माहिती मिळाली की, सिल्कमिल कॉलनीतील हमालवाडा रोडवरील रेल्वेस्टेशन वालकंपाउंड भिंतीलगत शेख मिनाज हा त्याच्या साथीदारासह एमडी पावडरची विक्री करत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 30, 2025 | 02:55 PM
रेल्वे स्टेशन परिसरात 'MD' विकणाऱ्या सराईताला बेड्या (Photo Credit - X)

रेल्वे स्टेशन परिसरात 'MD' विकणाऱ्या सराईताला बेड्या (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या
  • ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
  • दोन साथीदार पसार
Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर रेल्वेस्टेशन परिसरात एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने पकडले. कारवाईदरम्यान एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी राजी १०.१५ वाजेच्यासुमारास करण्यात आली.

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल

शेख मिजान शेख नईम (२७, रा. गल्ली क्रं., सिल्कमिल कॉलनी, रेल्वे स्टेशन) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ०.८९ ग्रॅम एमडी, अॅपलचा मोबाइल, एक रेल्वे तिकिट आणि दोन चाव्या असा सुमारे ६५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर त्याचे साथीदार कैफ कुरेशी (रा. मदनी चौक, रोशनगेट) आणि मस्तान आरिफ (रा. भिवंडी, मुंबई) हे दोघे पसार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ प्रतिबंधक पथकास माहिती मिळाली की, सिल्कमिल कॉलनीतील हमालवाडा रोडवरील रेल्वेस्टेशन वालकंपाउंड भिंतीलगत शेख मिनाज हा त्याच्या साथीदारासह एमडी पावडरची विक्री करत आहे. या माहिती आधारे सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, हलवादार लाला पठाण, सतिष जाधव, विजय ञिभूवन, नितेश सुंदर्डे, गणेश काळे यांच्या पथकाने सापळा रचून रात्री सुमारे १०.३० वाजता दोन संशयित घटनास्थळी आढळून आले.

हे देखील वाचा: निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी छापा टाकताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक कैफ कुरेश हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर शेख मिजान याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ०.८९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.

याशिवाय त्याच्याकडून एक अॅपल कंपनीचा आयफोन, दादर-मनमाड रेल्वे तिकीट, दोन धातूच्या चाव्या व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एकिलवाले हे करत आहेत.

मिजान हा सराईत

मिजान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सातारा, क्रांतीचौक व जालना जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अमली पदार्थ, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्ञ बागळणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे देखील वाचा: पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

Web Title: Habitual offender selling md in railway station area arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Drugs Case

संबंधित बातम्या

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Ratnagiri Police: ड्रग्स विरोधात कडक कारवाई करा; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
2

Ratnagiri Police: ड्रग्स विरोधात कडक कारवाई करा; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा
3

Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह
4

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.