Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

हडपसरमधील लॉजमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि तरुण काही वेळातच निघून गेला. त्यानंतर तरुणीचा मृत्यू उघडकीस आला; कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 27, 2026 | 11:21 AM
Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Follow Us
Follow Us:
  • लॉजमध्ये वादानंतर तरुण निघून गेला
  • काही वेळाने तरुणीचा मृत्यू उघड
  • तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
पुणे: हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२४ सप्टेंबर) सकाळी घडली. तरुणीसोबत लॉजमध्ये आलेल्या तरुणाशी वाद झाल्यानंतर तो तेथून निघून गेला. काही वेळाने तरुणी खोलीत असल्याचे लक्षात आल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी ती मृतावस्थेत आढळली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे मृत तरुणीचे नाव आहे. विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. साक्षी आणि विश्वास यांची पूर्वीपासून ओळख होती. गुरुवारी सकाळी दोघे हडपसरमधील एका लॉजमध्ये आले होते.

हेही वाचा:Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

वादानंतर तरुण निघून गेला

सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वादानंतर विश्वास हा लॉजमधून निघून गेला. त्यानंतर साक्षी खोलीतच राहिली. काही वेळाने ती बाहेर न आल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांनी खोलीची पाहणी केली असता ती मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, साक्षीच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा: रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कारवाई

साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वास जगताप याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र, तरुणीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, दोघांमधील फोन कॉल्स आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. तपासातून घटनेपूर्वी दोघांमध्ये नेमके काय घडले आणि त्याचा मृत्यूशी काय संबंध होता, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Hadapsar lodge woman death youth arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • crime news
  • pune crime case
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
1

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
2

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
4

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.