
Big Breaking: परभणी हादरली! मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला अन् 30 ते 40...; 5 भाविकांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला आहे. यामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ढीगाऱ्याखाली 30 ते 40 भाविक अडकल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.
या घटनेने परभणीत खळबळ उडाली आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. मानवत तालुक्यात यशवाडी येथे एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. शनिवार असल्याने हनुमान मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र त्याच वेळेस मंदिराचा सभामंडप कोसळल्याने 30 ते 40 भाविक ढीगाऱ्याखाली अडकल्याचे समोर येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…