Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू तर 7 महिला जखमी

मसूर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता पूर्णपणे उखडलेला, खड्डेमय झाला आहे. वाहनचालकांना अचानक खड्डा समजत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2026 | 11:38 AM
मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात

मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात

Follow Us
Close
Follow Us:

मसूर : निकृष्ट दर्जाच्या व जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेल्या मसूर-उंब्रज काम सुरू असलेल्या रस्त्याने अखेर एका महिलेचा बळी घेतला. मसूर पोस्ट ऑफिससमोर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव बोलेरोने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.

या अपघातात रेशमा रमजान मुजावर (वय ५३, रा. खडकपेठ, मसूर) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. सदर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनिल मोहन कुराडे (रा. उंब्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची नोंद उशिरापर्यंत मसूर पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.

हेदेखील वाचा : Jalna Road Accident : जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांना ट्रकने चिरडलं

सध्या मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने अनेक ठिकाणी खड्डे तसेच ठेवले आहेत. मसूर-उंब्रज रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर खड्डा चुकवण्याच्या नादात बोलेरो (एमएच ०४ एफ के २९४६) ही शेतमजुरीसाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या ॲपे रिक्षा (एमएच ११ एल ८२९७) ला समोरून उजव्या बाजूने जोराची धडक दिल्याने ॲपे रिक्षातील रेश्मा रमजान मुजावर (वय 48) ही महिला जागीच ठार झाली.

जिजाबाई रघुनाथ जाधव, शाहीदा सिकंदर शेख, अलका सदाशिव जाधव, सविता मारुती शिरतोडे, मंगल दिलीप जाधव, पाकीजा फिरोज शेख, ज्योती नितीन जाधव सर्व रा. मसूर या सात महिला अपघातात गंभीर जखमी जखमी झाल्या.

रस्ता की मृत्यूचा सापळा

मसूर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता पूर्णपणे उखडलेला, खड्डेमय झाला आहे. वाहनचालकांना अचानक खड्डा समजत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होत आहेत. आज त्याच निष्काळजीपणाने एका महिलेचा बळी घेतला. रस्ता की मृत्यूचा सापळा? असा मोठा प्रश्न आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी, ठेकेदारांनी डोळेझाक केली. त्यात आज एका महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

पोलिस ठाण्यावर संतप्तांचा हल्लाबोल

अपघातानंतर संतप्त नागरिक, मुस्लिम बांधव व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने मसूर पोलीस ठाण्यावर धडकले. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरा. बोलेरो चालकावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी करत, कारवाई झाली नाही तर मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच दफन करू, असा इशाराही देण्यात आला. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गांभीर्यता पाहता दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

Web Title: Horrific accident on masur umbraj road one woman dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Accident News
  • Satara News

संबंधित बातम्या

Medical Shops Strike: मेडिकल स्टोअर्स बंदमुळे नागरिक हैराण; मागण्या न मानल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा
1

Medical Shops Strike: मेडिकल स्टोअर्स बंदमुळे नागरिक हैराण; मागण्या न मानल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

Yashwant Co-operative Bank: साताऱ्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का; यशवंत बँकेचे व्यवहार तत्काळ बंद
2

Yashwant Co-operative Bank: साताऱ्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का; यशवंत बँकेचे व्यवहार तत्काळ बंद

Mhaswad Police: म्हसवडमध्ये सुसाट पळणाऱ्या ‘सैराट’ दुचाकीस्वारांना कोणी लावला चाप? नागरिकांना का मिळाला मोठा दिलासा?
3

Mhaswad Police: म्हसवडमध्ये सुसाट पळणाऱ्या ‘सैराट’ दुचाकीस्वारांना कोणी लावला चाप? नागरिकांना का मिळाला मोठा दिलासा?

Medical Store : 20 मे रोजी औषध दुकाने बंद राहणार? साताऱ्यात प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
4

Medical Store : 20 मे रोजी औषध दुकाने बंद राहणार? साताऱ्यात प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.