Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! जमिनीच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; संपूर्ण परिसर हादरला

चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. निराळे कुटुंबातील ४ सदस्यांसह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून भिमातीर परिसरात तणाव आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 09:24 PM
राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! (Photo Credit- X)

राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना!
  • जमिनीच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
  • संपूर्ण परिसर हादरला
चडचण, सोलापूर प्रतिनिधी: विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गाव शुक्रवारी सायंकाळी अचानक गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेले आणि काही क्षणांतच सहा निष्पाप जीव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जमिनीच्या जुन्या वादातून घडलेल्या या भीषण सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण भिमातीर परिसर हादरून गेला असून गावात भीती, तणाव आणि हळहळ व्यक्त होत आहे.

गोविंदपूर येथील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळत गेला आणि अखेर शुक्रवारी त्याचे रूप थेट रक्तरंजित संघर्षात बदलले. सायंकाळच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोर गावात दाखल झाले आणि त्यांनी थेट अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गावात एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी घरांकडे धावू लागले.

या अमानुष गोळीबारात रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अनेक कुटुंबांचे आधारवड एका क्षणात कोसळल्याने गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि मोठा पोलीस बंदोबस्त तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण गाव पोलिसांनी छावणीत रूपांतरित केले असून तणावपूर्ण शांतता कायम आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. सीमाभागात नाकाबंदी करून संशयितांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

या रक्तरंजित घटनेमुळे विजयपूर जिल्ह्यासह सोलापूर सीमाभागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जमिनीचा वाद इतका विकोपाला जाऊन सहा जीवांचा बळी जाईल, याची कल्पनाही नव्हती, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण चडचण तालुका सुन्न झाला असून गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Toxic Liquor Tragedy: मुख्य सूत्रधारांसह ४ आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; ‘मिथेनॉल’च्या वापरामुळे १८ जणांचा बळी

Web Title: Horrific incident near the state border six brutally shot dead over a land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • crime news
  • Karnataka
  • Murder Case

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
1

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…
2

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल
3

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.