Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव

Maval Crime News : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील केशवनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 12:55 PM
पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

Follow Us
Follow Us:

Maval Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील केशवनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. 18 एप्रिल रोजी ही हत्येची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Crime News)

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भाग-5 गुन्हा क्रमांक 114/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 115(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आप्पासो सुखदेव कदम (वय 65, रा. गोतंडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी आपल्या मुलीच्या हत्येबाबत तक्रार नोंदवली आहे.

वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सौ. सोनाली विनोद कणसे (वय 35, रा. केशवनगर, वडगाव मावळ) हिचा तिचा पती विनोद लालासे कणसे (वय 37) याच्यावर खुनाचा आरोप आहे. सोनाली हिचे लग्न झाल्यापासून आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातून तो वारंवार तिच्याशी वाद घालत, शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Buldhana Crime: DJ वर नाचताना धक्का लागल्यावरून वाद; 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

दि. 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.30 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान, केशव हाइट्स, केशवनगर येथील त्यांच्या राहत्या घरात दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक स्वरूपात झाले आणि आरोपीने संतापाच्या भरात कोणत्यातरी कठीण वस्तूच्या सहाय्याने पत्नीच्या डोक्यावर, छातीवर तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. या गंभीर मारहाणीमुळे सोनाली कणसे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर दि. 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:08 वाजता वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली. स्टेशन डायरी नोंद क्रमांक 26/2026 अशी असून, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

हे देखील वाचा : जुन्नरमध्ये भीषण अपघात! हायवा-कार समोरासमोर धडक; नायब तहसीलदारांचा मृत्यू, दोघे जखमी

पोलिसांनी आरोपी विनोद कणसे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच प्रकरणाची माहिती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC), वडगाव मावळ न्यायालय यांना पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक पाटील तसेच तपासी अधिकारी सपोनि राऊळ यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे

Web Title: Husband murders wife over suspicion of character vadgaon maval crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • crime news
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
2

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
3

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई
4

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.