Buldhana Crime: DJ वर नाचताना धक्का लागल्यावरून वाद; 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
कसा झाला अपघात ?
महसूल अधिकाऱ्यांची Honda City (कार क्रमांक MH 12 FF 6423 ) ही कार बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होती. त्याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची (क्रमांक-MH 14 K00812) हा एस कॉर्नरवर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार फिरून उलट दिशेला वळली. यात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर महसूल विभागातील कर्मचारी विजय खर्तोडे (वय 48) गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे (वय 35) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. येथून प्रवास करणारे पत्रकार अरुण मोरे यांनी या जखमींना आपल्या कार मध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असतांना अनंता गवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव तेजस पिलाने असे आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime: संतापजनक प्रकार! चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अटकेत
Ans: जुन्नर तालुक्यातील गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर.
Ans: नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा.
Ans: घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि तपास सुरू केला आहे.






