Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

हैदराबादजवळील रंगा रेड्डी जिल्ह्यात POCSO प्रकरणातील आरोपीने एका रात्रीत 7 जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने प्रथम 16 वर्षीय पीडित मुलगी, तिची आई व आजी यांची हत्या केली. त्यानंतर पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचाही खून करून तो फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 11:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • POCSO प्रकरणातील आरोपीने एका रात्रीत 16 वर्षीय मुलीसह एकूण 7 जणांची हत्या केल्याचा आरोप.
  • पीडित मुलगी, तिची आई आणि आजीची हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नी व दोन लहान मुलांचाही गळा चिरला.
  • आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.
हैद्राबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. ३५ वर्षीय शेतकऱ्याने एका रात्रीत सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे.या आरोपीने प्रथम POCSO प्रकरणातील 16 वर्षीय पीडित मुलगी, तिची आई आणि आजी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनतर स्वतःच्या घरी जाऊन पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचाही गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय नेमकं प्रकरण?

आरोपीविरोधात मे महिन्यात 16 वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर शुक्रवारी रात्री सुमारे 10.45 वाजता तो आपल्या गावातून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाबाद शहरात मुलीच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याने ४२ वर्षीय आईवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यांनतर त्याने घरात प्रवेश करत झोपलेल्या 60 वर्षीय आजीची हत्या केली. यांनतर त्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून नेले. मात्र त्यावेळी घरात असलेल्या मुलीच्या 20 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग बहिणीला त्याने कोणतीही इजा केली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

आपल्या पत्नी आणि…

आरोपी त्याला मुलीला घेऊन आपल्या गावाजवळील तलाव परिसरात गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलीची चाकूने हत्या करून तिचा मृतदेह तलावाच्या बंधाऱ्याजवळ टाकला. त्यांनतर रात्री 11.21 वाजता तो स्वतःच्या घरी गेला. तिथे त्याने अवघ्या सहा मिनिटात त्याने झोपलेल्या 31 वर्षीय पत्नी तसेच चार वर्षांचा आणि 18 महिन्यांचा अशा दोन मुलांचा गळा चिरून हत्या केली. यानंतर आरोपीने शाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना फोन केले. त्यांनतर घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर कार घेऊन तेथून पळ काढला.

आरोपी फरार

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सांगितले की जून महिन्यात त्याने शाबादमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. संबंधित गुन्ह्यात कमाल सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची वैयक्तिक हमीवर सुटका करण्यात आली होती. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Nagpur Crime: 17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने सर्वप्रथम कोणाची हत्या केल्याचा आरोप आहे?

    Ans: आरोपीने सर्वप्रथम POCSO प्रकरणातील 16 वर्षीय पीडित मुलगी, तिची आई आणि आजी यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीने स्वतःच्या कुटुंबासोबत काय केले?

    Ans: आरोपीने घरी जाऊन पत्नी तसेच चार वर्षांचा आणि 18 महिन्यांचा अशा दोन चिमुकल्या मुलांचा गळा चिरून खून केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Hyderabad crime accused in pocso case goes on a bloody rampage 7 people including a minor girl brutally murdered accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.